• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा

by Manoj Bavdhankar
November 18, 2022
in Politics
23 0
0
रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा
45
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंत्री चव्हाण, जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनसाठी भाजपची बैठक

मुंबई, दि. 18 : भाजपची (BJP Meeting) संघटनात्मक ताकद वाढवा. रत्नागिरी जिल्हयातील आगामी ग्रामपंचायतीच्या तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढा. सर्व निवडणुकांच्या निकालात रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय झाला पाहिजे.  असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (PWD Minister Ravindra Chavan) यांनी आज केले.

          भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी आदींची एक बैठक (BJP Meeting) आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (PWD Minister Ravindra Chavan)  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane), माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, रत्नागिरी उत्तरचे कार्याध्यक्ष केदार साठे (Kedar Sathe) आदी मान्यवर उपस्थित होते.

          रत्नागिरी जिल्ह्यातील होणा-या २२८ ग्रामपंचायत निवडणुकांसदर्भातील आढावा व त्या निवडणुकांचे नियोजन तसेच संघटनात्मक बाबींसंदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी आपले मनोगत व्यक्त केले.BJP Meeting

BJP Meeting
BJP Meeting

BJP Meeting

          यावेळी मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मजबूत सरकार आहे. राज्यामध्ये भाजपचे सरकार (BJP Government) आहे.  त्यामुळे आता रत्नागिरी जिल्हयामध्येही भाजपची ताकद अधिक वाढविली पाहिजे. भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावीपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.  जिल्हयामध्ये संघटना अधिक बळकट करण्याच्यादृष्टीने प्रत्येकाने आता कामाला लागावे. आपल्या कार्यकर्त्याने तळागळातील प्रत्येक घटकाशी संर्पक अधिक वाढविला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध समाजाचे कार्यकर्ते कार्यरत आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक कार्यकर्ता भाजपशी कशा पध्दतीने जोडला जाईल. भाजपमध्ये सक्रीय कसा होईल. यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपला पूर्ण ताकदीने लढवायच्या आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रभागापासून जिल्हा परिषदपर्यंत प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच शत प्रतिशत यश मिळाले पाहीजे. असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. बैठकीमध्ये माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांनीही मार्गदर्शन केले. BJP Meeting

या बैठकीला माजी आमदार विनय नातू (Vinay Natu), रामदास राणे, मकरंद म्हादलेकर, अनिकेत कानडे, प्रमोद अधटराव, अभिजित गुरव, सुशांत चवडे, सचिन करमरकर, मुन्ना खामकर, वसंत ताम्हणकर, निलेश सुर्वे, सचिन करमरकर, राजश्री विश्वासराव, स्मिता जावकर, ऐश्वर्या जठार, सुरेख खेराडे, मृणाल शेटे, शिल्पा मराठे, परिमल भोसले, चंदुभाई लिंगायत आदी पदाधिकारी उपस्थित होते.BJP Meeting

कोकण शिक्षक मतदारसंघाची नोंदणी वाढवा

कोकण शिक्षक मतदारसंघाची पहिल्या टप्प्याची प्रारुप मतदार यादी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द होणार आहे. या मतदारयादी संदर्भात दावे व हरकती या २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारनोंदणी सध्या सुरु आहे. परंतु नोंदणी केलेल्यांची संख्या मागील निवडणुकीतील मतदार नोंदीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोचून नोंदणीमध्ये वाढ करावी. असे आवाहन यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.BJP Meeting

Tags : भाजप, BJP, सार्वजनिक बांधकाम मंत्री, रविंद्र चव्हाण, BJP Meeting, निलेश राणे, Nilesh Rane, केदार साठे, Kedar Sathe, पंतप्रधान, नरेंद्र मोदी, PM, Narendra Modi, भाजप सरकार, BJP Government, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

Share18SendTweet11
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.