उमेश भोसले : शहर भाजपने केली वचनपूर्ती
गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळाल्यास शहर विकास आराखडा बनण्यापूर्वी सध्या वापरात असलेल्या जमीनींचा ड्रोनद्वारे सर्व्हे केला जाईल. असे आश्र्वासन निवडणुकीमध्ये आम्ही दिले होते. आज नगर रचना विभागाने विद्यमान जमीन वापर नकाशा नगरपंचायतीकडे दिला आहे. त्यामुळे भाजपच्या वचननाम्यातील एका विषयाची पूर्ती (BJP fulfilled its promise) झाली आहे. अशी माहिती भाजपचे गटप्रमुख उमेश भोसले यांनी सकाळला दिली.
गुहागर नगरपंचायतीमध्ये आज नगर रचना विभागाने सद्यस्थितीत वापरात असलेल्या जमीनीचा सर्व्हेचे नकाशे व अन्य कागदपत्रे सोपवली. त्यानंतर दै. सकाळशी बोलताना भाजपचे गटनेते उमेश भोसले म्हणाले की, गुहागरच्या विकासासाठी शहर विकास आराखडा तयार होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शहर विकास आराखडा नसल्याने महत्त्वाकांक्षी पाणी योजना रखडली आहे. (BJP fulfilled its promise)
नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेळी प्रसिध्द केलेल्या भाजपच्या वचननाम्यामध्ये आम्ही शहर विकास आराखड्याबाबत एक वचन नागरिकांना दिले होते. विकास आराखडा तयार करण्यापूर्वी गुहागर नगरपंचायत हद्दीतील जमीनीवर कोणकोणत्या गोष्टी आहेत याची ड्रोनद्वारे तपासणी केली जाईल. जेणेकरुन विकास आराखडा बनविताना संबंधित शासकीय यंत्रणेला गुहागर शहरातील मोकळ्या जागा कोणत्या याची माहिती होईल. आरक्षणे टाकताना घरे, कार्यालये, व्यावसायिक इमारती वगळणे सोपे होईल. भाजपने आज या वचनाची पूर्तता केली आहे. (BJP fulfilled its promise)
आता हे नकाशे नागरिकांसाठी प्रसिद्ध करुन त्यातील त्रुटी, बदल यांची माहिती प्रशासनाला देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक गजानन वेल्हाळ, नगरसेविका सौ. मृणाल गोयथळे व सौ. भाग्यलक्ष्मी कानडे उपस्थित होत्या. (BJP fulfilled its promise)