गुहागर, ता. 06 : आबलोली गावाच्या एकोप्यासाठी दिवस – रात्र झटणारे, प्रत्येकाच्या सुख दु:खात मदत करणारे आणि आतापर्यंत ९१ वेळा रक्तदान करुन अनेकांचे जीव वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. विद्याधर राजाराम कदम तथा आप्पा कदम यांचा जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणारे आप्पा कदम यांचा सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे रक्तदान शिबिर उत्साहात साजरा करण्यात आला. Birthday blood donation camp
यावेळी नुकतेच निधन झालेले सामाजिक कार्यकर्ते अनंत पवार यांना श्रध्दांजली वाहिण्यात आली. आप्पा कदम यांचा स्वपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आप्पा कदम यांनी ९१ व्या वेळा रक्तदान करुन रक्तदान हेच श्रेष्ठदान हे सिध्द केले. तर या रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आप्पा कदम यांना रक्तदानाच्या शतकपूर्तीच्या वाटचालीस पाठींबा दिला. Birthday blood donation camp
यावेळी बोलताना आप्पा कदम यांनी प्रत्येकाने किमान एक वेळ रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन केले. माझ्या जन्मदिनी घेण्यात आलेले रक्तदान शिबीर हे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत अनंत पवार यांना अर्पण करतो असे ते म्हणाले. Birthday blood donation camp
या रक्तदान शिबिरात रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे एन. सी. डी. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे, डॉ. रुतुजा वायबसे, डॉ. सुरेखा कुटे, डॉ. स्वाती पवार, समर्थ अनाप, श्रीमती मयुरी शिरीष वारंग, प्रतिक अंबोरे, संदिप पवार, संदिप वाडेकर, सचिन कारेकर, पोलिस पाटील महेश भाटकर, ग्रामसंवाद सरपंच असोशिएशन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रमेय आर्यमाने यांनी विशेष प्रयत्न केले. Birthday blood donation camp
यावेळी माजी सभापती सौ. पूर्वीताई निमूणकर, गारवा कृषी पर्यटन केंदाचे मालक सचिन कारेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिन बाईत, माजी पंचायत समीती सदस्य रविंद्र आंबेकर, ग्रामसंवाद सरपंच असोशिएशन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रमेय आर्यमाने, पोलीस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच महेंद्र कदम, नरेश निमूणकर, विजय पागडे, अनिकेत पागडे, सुहास गायकवाड, ग्रामसेवक सुर्यवंशी, श्री. राजेशिर्के, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे, यांचेसह आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. Birthday blood donation camp