दक्ष राजाची कन्या सतीदेवी हिने शंकराशी विवाह केला. त्यानंतर झालेल्या एका यज्ञाच्यावेळी राजा दक्षाने सतीदेवींना आणि श्री शंकरांना आमंत्रण दिले नाही. तरीही माहेरीच यज्ञ आहे. मग बोलावणे कशाला हवे असे म्हणून सतीदेवी तेथे गेल्या. परंतू राजा दक्षाने सर्वांसमक्ष सतीचा आणि श्री शंकरांचा अपमान केला. त्यामुळे रागावलेल्या सतीदेवींनी सर्वांना खडे बोल सुनावत तेथील यज्ञकुंडात उडी घेतली. ही बातमी कळताच भगवान शंकर यज्ञमंडपात उपस्थित झाले व सतीचे शव खांद्यावर घेऊन तांडव करण्यास सुरवात केली. हे पाहून भगवान विष्णूनीं सुदर्शनाने सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे आणि सांगितले हे तुकडे जेथे जेथे पडतील तेथे शक्ति पीठे निर्माण होतील.
यावेळेस सतीदेवीचा खालचा ओठ उज्जैनीजवळीस (मध्यप्रदेश) एका पर्वतावर पडला. ते स्थान भैरव पर्वत म्हणून प्रसिद्ध झाले. काही भाविक लोक ही जागा दुसरी गिरनाजवळ असल्याचेही मानतात. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या हे स्थान उज्जैनजवळचेच आहे. कारण उज्जैनी येथील महाकाळ (बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक) हा शिवस्वरुप आणि भैरव पर्वतावर शक्ती आहे. भैरव पर्वत हे स्थान उज्जैनीपासून 85 किमी अंतरावर असून तेथील गुहेमध्ये देऊळ वसले आहे. तेथील देवीला अवंतिका माता, गडकालिका म्हणून ओळखले जाते. भैरव पर्वतावरील या गुहेपर्यंत (मंदिरापर्यंत) जाण्यासाठी पायऱ्या चढुन जावे लागते. भक्तांनी एकदातरी या स्थानाचे दर्शन घ्यावे.
- सौ. मिनल अमित ओक, वेळंब
समिती परिचय
स्त्री ही स्वत: प्रकृति आहे. सृष्टीची आद्यशक्ती आहे. या आदीशक्तीलाच आपण महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती म्हणून ओळखतो. प्रत्येक स्त्री ही त्या शक्ती तत्त्वाचा अंश आहे. या संकल्पनेने प्रेरित होवून भारतीय संस्कृति प्रभावित झाली आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने समाजाच्या उन्नतीसाठी सुप्तशक्तींनाच आधार मानलं आहे. आपण पहातो की, प्रत्येक कार्याय शक्ती तत्त्वाचा समावेश असतोच. या शक्तीला जागृत करुन, संघटित करुन तिला राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी करण्याचं विलक्षण ध्येय आधुनिक ऋषिका वंदनिय मावशींनी आपल्यासमोर ठेवलं. त्याच ध्येयपूर्तीसाठी राष्ट्र सेविका समितीची स्थापना १९२६ साली विजयादशमीच्या दिवशी वर्धा येथे केली. याच राष्ट्र सेविका समितीतफे रत्नकोंदण या उपक्रमात विविध शक्तीपिठांची माहिती करुन दिली जात आहे. ही माहिती युट्युबवर उपलब्ध आहे.