• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बागेश्रीने श्रीलंकाही ओलांडली

by Guhagar News
July 7, 2023
in Guhagar
1.9k 20
0
Bageshree also crossed Srilanka
3.7k
SHARES
10.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहा अजुनही केरळ, कर्नाटकच्या सीमेवर

गुहागर, ता. 07 :  गुहागरहून निघालेल्या बागेश्री या ऑलिव्ह रिडले कासवाने श्रीलंकेचा समुद्रही पार केला आहे. सध्या ति श्रीलंकेतील मातारा या किनारपट्टीच्या शहरापासून 120 किमी दूर आहे. गुहा मादी मात्र अजुनही केरळ कर्नाटकच्या सीमेवर रेंगाळली आहे. Bageshree also crossed Srilanka

Bageshree also crossed Srilanka

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा जीवनप्रवासाची माहिती व्हावी यांनी कांदळवन प्रतिष्ठान, वन विभाग आणि भारतीय वन्य जीव संस्था यांच्याद्वारे अभ्यास सुरु आहे. या अभ्यासाचा भाग म्हणून फेब्रुवारी महिन्यात (23 फेब्रुवारी)  गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर जोडून समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे 23 फेब्रुवारीपासून त्यांच्या समुद्रातील प्रवासाची माहिती सातत्याने भारतीय वन्य जीव संस्थेला मिळत होती. गेल्या चार महिन्यात या दोन्ही कासवांनी सुरवातीला उत्तरेकडे जावून पुन्हा दक्षिणेकडील प्रवासाला सुरवात केली. Bageshree also crossed Srilanka

बागेश्रीचा प्रवास सातत्याने वेगाने दक्षिणेकडे जाणारा होता. १८ जूनला बागेश्री कन्याकुमारी जवळ होती. त्यानंतर तिचा प्रवास श्रीलंकेकडे सुरू झाला. ३ जुलैला बागेश्री श्रीलंकेतील गॅले शहराच्या सागरी हद्दीत होती. तर 5 जुलैला श्रीलंकन सागरी हद्द पार करुन बागेश्री  मातारा या किनारपट्टीच्या शहरापासून 120 किमी दूर गेली आहे. तिने साधारणपणे 1200 कि.मी.चा प्रवास केला आहे. गुहाचा या मादीचा प्रवास काहीसा रेंगाळणारा ठरला आहे.  तिने 500 ते 600 कि.मी. प्रवास केला आहे. Bageshree also crossed  Srilanka

Bageshree also crossed Srilanka

बागेश्रीचा प्रवास अत्यर्क – डॉ. सुरेश कुमार

बागेश्री आणि गुहा या दोन्ही कासवांच्या स्वभावात, वागण्यात मोठा फरक असल्याचे त्यांच्या प्रवासावरुन जाणवते. बागेश्रीचा प्रवास केवळ अन्नासाठी नाही. इतक्यातच ति श्रीलंकेच्या पुढे का गेली हे सांगता येणार नाही. मात्र गुहा पुन्हा कोकण किनारपट्टीवर येऊ शकेल. असे भारतीय वन्य जीवसंस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार यांनी सांगितले. Bageshree also crossed Sri Srilanka

आजवरच्या प्रवासाबाबतची निरीक्षणे नोंदवताना शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार म्हणाले की, माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या स्वभावात, वागण्यात फरक असतो. तसाच फरक ऑलिव्ह रिडले मादी कासवांमध्येही आहे. ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे एकाच भागात स्थिर रहात नाहीत. त्यांचे निवासाचे क्षेत्र निश्चित नसते. या अभ्यासावरुन गुहा व बागेश्रीचा  प्रवास अन्नाच्या शोधात सुरु असेल असा आमचा अंदाज होता.  जेलीफिश, विशिष्ट जातींचे मासे व समुद्री शेवाळ हे अन्न जीथे मुबलक प्रमाणात मिळेल तिथे कासवे काही काळ थांबतील असा तर्क होता. गुहाचा प्रवास या तर्काप्रमाणेच सुरु आहे. मात्र बागेश्रीने या तर्काला खोटे ठरवले.  आपल्याला सातत्याने त्यांच्या प्रवासाची माहिती वर्षभर मिळत राहीली तर आणखी काही गोष्टीसमोर येतील. गुहा कदाचित पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर येईल असा अंदाज आहे. बागेश्रीबाबत आत्ताच असा तर्क लावणे कठीण आहे. Bageshree also crossed Srilanka

Share1487SendTweet929
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.