पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रम
सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. सीमा भागातील बलशाली गावे म्हणजे बलशाली राष्ट्राकडे वाटचाल असल्याचं ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 हजार 400 सीमावर्ती गावे निवडण्यात आली. असून केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी भेटी देणार आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये एक रात्र वास्तव्य करून तिथल्यालोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहेत. Vibrant Villages Program व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री तीन आणि चार मार्च 2023 रोजी लडाखच्या दोन दिवसीय भेटीवर होते. यावेळी त्यांनी इतर गावांसह त्सागा पाश्चर, रेझान्ग-ला आणि चुशुल या गावांना भेटी दिल्या....
Read moreDetails


















