• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्यात १५ ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रांना मंजुरी

by Guhagar News
April 11, 2023
in Ratnagiri
161 1
0
Approval of 'Arogyavardhini' Centers in Ratnagiri
316
SHARES
902
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.11 : मोठ्या शहरांमध्ये ‘आपला दवाखाना’ सारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा देण्याचा शासनाच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजूर मिळाली आहे. Approval of ‘Arogyavardhini’ Centers in Ratnagiri

ग्रामीण भागामध्ये तळागाळातील रुग्णांच्या उपचारासाठी उपकेंद्रांचा आधार असतो. त्याच धर्तीवर शहरांमध्येही ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरु करण्यात येत आहेत. त्या आरोग्यवर्धिनी केंद्रांना 1 वैद्यकीय अधिकारी, नर्स, परिचर आणि शिपाई अशी पदे मंजूर करण्यात आली आहेत. रत्नागिरीत झाडगाव, कोकणनगर येथे जिल्हा परिषदेची उपकेंद्र कार्यरत आहेत. त्यामुळे शहरात उद्यमनगर, लक्ष्मीचौक परिसरात दोन वर्धिनी केंद्र सुरु केली जाणार आहेत. Approval of ‘Arogyavardhini’ Centers in Ratnagiri

ही केंद्र सुरु करण्यासाठी निश्चित केलेल्या परिसरात भाडेतत्त्वावर जागा घ्यावयाच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी स्थानिक पालिका किंवा नगर पंचायतीचे सहकार्य घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सध्या मंजूर पदांपैकी 12 वैद्यकीय अधिकारी, 2 नर्स ही पदे भरली गेली आहेत. उर्वरित पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. Approval of ‘Arogyavardhini’ Centers in Ratnagiri

Tags: Approval of 'Arogyavardhini' Centers in Ratnagiri
Share126SendTweet79
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.