(भाग 12)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम
१. डोळ्यातील सगळ्यात आतील पटल रेटायना त्याची कार्यहानी होते . त्याला डायबेटिक रेटीनोपॅथी म्हणतात.
२. काचबिंदू आणि मोतीबिंदू – मोतीबिंदू मधुमेहीत लवकर तयार होतो. याकरिता मधुमेही रुग्णांना डोळ्याची तपासणी आवश्यक आहे.
मूत्रपिंड व मूत्राशय यावर होणारे परिणाम
मूत्रपिंडावर परिणाम होऊन किडनी फेल होण्याचे परिणाम डायबेटिक रुग्णांमध्ये अधिक असते.
मूत्राशय न्यूरोजेनिक ब्लॅडर मध्ये मूत्राशयाची कार्यहानी होते व त्यामुळे मूत्राशय लघवी बाहेर टाकण्यास असमर्थ होते. याकरिता मायक्रोअलब्युबीन, क्रियाटीनीन, सोनोग्राफी य नियमित तपासण्या आवश्यक आहेत.
हृदय रक्तवाहिन्यांचा विकार (coronary artery disease)
मधुमेहामध्ये करोनरी आरटेरी ब्लोकेजेस तयार होतात व हार्ट अॅटॅक येतो. या करिता नियमित कोलेस्टेरॉल, 2D इको, ट्रेडमिल टेस्ट, इसिजी या तपासण्या आवश्यक आहेत.
पेरिफेरल आरटेरी डिसीज
हातापायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. परिणामी, चालताना, व्यायाम करताना वेदना होतात . हातपाय गार पडतात, जखमा भरत नाहीत. या करिता पायाची अॅंजिओग्राफी, कलर डोपलर या तपासण्या आवश्यक आहेत.
लकवा: जर मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात दोष निर्माण झाला तर हा विपरीत परिणाम दिसून येतो. बरेच वेळा रक्तवाहिन्यात रक्त गोठते व रक्ताची गाठ होते ह्यामुळे पॅरॅलिसिस होतो.
हातापायावरही हा परिणाम दिसून येतो. ह्यामुळे हालचालीस कठीणता येते, वेदना होतात , स्पर्शज्ञान कमी होते. काही वेळा विसराळूपणा येतो, विचारशक्ती कमी होते, बोलण्यात दोष निर्माण होतो.
शरीराच्या एका बाजूस अशक्तता जाणवते, त्या बाजूला स्पर्शज्ञान कमी होते, मनुष्य गोंधळून जातो, त्याची आकलन शक्ती कमी होते, बोलण्यात दोष निर्माण होतो, तोल जाऊ लागतो, चालताना अडखळतो, पडतो, डोळ्यास डबल दिसते व खूप डोके दुखते. ह्यासाठी मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. तसेच योग्य आहार- विहार, व्यायाम व औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे.
मेंदूदाह व मेंदूवर होणारे विपरीत परिणाम
मधुमेहीत अल्झायमर जास्त प्रमाणात आढळतो. स्मरणशक्ती कमी होते. आकलनशक्ती कमी होते. विस्मरण वाढते. ह्याचे कारण मेंदूस नीट न होणारा रक्तपुरवठा व इन्सुलिन चा मेंदूवर होणारा परिणाम कारणीभूत असतो.
पचनशक्ती मंदावणे
ह्यात जठरातील अन्न लवकर पुढे सरकत नाही. याचे कारण व्हेगस नर्व्ह खराब होणे हे आहे. ह्यात घशाची जळजळ होते, उलटी होणे, मळमळणे ही लक्षणे आढळतात. पोटात सतत दुखणे, वजन कमी होणे , पोट फुग्ल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसून येतात . योग्य आहार –विहार , व्यायाम , मधुमेहावर नियंत्रण याने ह्यावर काबू मिळवता येतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी Join Diabetic Club वर क्लिक करा.
(Part 12…..)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
https://guhagarnews.com/my-journey-towards-diabetes/
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात https://guhagarnews.com/tests-for-diabetes/
भाग ८ : शरिरातील साखरेची तपासणी
https://guhagarnews.com/body-sugar-test/
भाग 9 : समजून घ्या HBA1C चाचणी
https://guhagarnews.com/hba1c-test/
भाग 10 : मधुमेहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
https://guhagarnews.com/effects-of-diabetes/
भाग 11 : मधुमेहींवर उपचार करताना…
https://guhagarnews.com/diabetes-treatment/
Diabetes, Apex Hospital, Ratnagiri, Lifestyle, Diabetic, जनजागृती, Awareness, मधुमेह, मधुमेही, sugar test, साखरेची तपासणी, Health, आरोग्य, जीवनशैली, Treatment,