आदित्य ठाकरे, पर्यटन विकासाचे नवे धोरण तीन महिन्यात
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पर्यटन व्यवसायासाठी मुंबईत आपण बैठक घेऊच. त्याचबरोबर गुहागरला येवून जिथे कामे करायची आहेत, ती ठिकाणे प्रत्यक्ष पाहु. म्हणजे नवीन काय करु शकतो याचा विचार आपल्याला करता येईल. असे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले. ते वेळणेश्र्वरमध्ये जाहीर सभेत बोलत होते. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development

वेळणेश्र्वर खारवीवाडी येथील 2 कोटी 20 लाख रुपयांच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन पर्यटन मंत्री नाम. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Guardian Minister Anil Parab), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant), आमदार भास्करराव जाधव (MLA Bhaskarrao Jadhav), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi), जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील (Collector Dr. B. N. Patil) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम व विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, विनायक मुळे, सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, माजी सरपंच नवनीत ठाकूर, पंचायत समिती सदस्य सुनील पवार, पांडुरंग कापले, जिल्हा परिषद सदस्य प्रविण ओक, विलास वाघे, आदींसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development

भूमीपूजनानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना पर्यटनमंत्री नाम. आदित्य ठाकरे म्हणाले की….
तर महाराष्ट्र पायी फिरेन
मच्छीमारांच्या घराखालील जमीनी नावावर करण्याचा निर्णय आजच झालायं. हा आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray)पायगुण आहे. असा उल्लेख आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. तो धागा पकडत आदित्य ठाकरे म्हणाले की, वास्ताविक हा योगायोग आहे. तुम्ही इतके वर्ष प्रयत्न केलेत. योगायोगाने आज मी इथे आलो त्याचवेळी तुमच्या हातात हा निर्णय पडला. पण जर खरोखरच हा पायगुण असेल तर मी संपूर्ण महाराष्ट्र पायी फिरायला तयार आहे. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development

सत्ता, पदे, नेतृत्त्व या संधी
महाराष्ट्राची सेवा करणारी ठाकरे कुटुंबातील माझी चौथी पिढी आहे. माझी परमेश्र्वराला आणि जनता जनार्दनाकडे एवढीच प्रार्थना आहे की, अशीच सेवा आमच्या हातून घडत राहो. सत्ता, पदे, नेतृत्त्व या संधी येत जात असतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवले आहे की, 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण. सत्तेत असाल तर 100 टक्के समाजकारण करा. त्याच्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करत आलो आहोत. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development
राजकीय दौरा करत नाही
मला राजकारणात येवून 10 वर्ष झाली. मी आजपर्यंत कुठेही राजकीय दौरा केलेला नाही. विद्यार्थी सेना आणि युवासेनेच्या माध्यमातून काम करताना विद्यार्थ्यांसाठी लढलो. आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशा दौऱ्यांमधुन सर्वसामान्य जनतेचा आवाज मी ऐकतो. त्यांचे रहाणीमान पहातो. विविध स्थळे पहाताना नव्या कल्पनां घेवून काय करता येईल याचा विचार करतो. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development

प्राण जाए पर वचन न जाऐ
महाविकास आघाडीचे देखील ब्रीद वाक्य आहे ‘प्राण जाए पर वचन न जाऐ’ हे आहे. हे ध्येय समोर ठेवून आम्ही गेली दोन वर्ष महाराष्ट्रात काम करतोय. माझी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही पहिली टर्म आहे. मी सभागृहात पूर्णवेळ बसून आमदार काय बोलतात, महाराष्ट्रात कोणते विषय सुरु असतात हे सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही हे सर्व शिकत असताना चौफेर तलवारबाजी सुरु आहे. पण आपण शिवरायांचे लढावू सैनिक आहोत. म्हणूनच कोविडच्या काळात, जे मुख्यमंत्र्यांनी, सरकारने केले त्याचे जगाने कौतूक केले. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development
विकासाची कामे होतच राहीली
कोविड महामारीबरोबरच गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आदी संकटे आली. मात्र विकास कामे होतच राहीली. चिपीला भव्य विमानतळ झाले. रत्नागिरीच्या विमानतळासाठी निधी दिलाय. धुपप्रतिबंधक बंधारा असो वा रस्ता असो शाश्वत विकासाची कामे आपण करत आहोत. दोन्ही जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची अनेक कामे करण्यासाठी 3 हजार 500 कोटींचा निधी अर्थसंकल्पात दिला आहे. त्याचबरोबर सिंधुरत्न योजनेतून दोन्ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र निधी दिलाय. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development

कोकणच्या विकासासाठी पर्यटन धोरण कोकणात पर्यटनाला वाव आहे. येथील निसर्ग, समुद्र हे कोकणचे ऐश्वर्य आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी पर्यटनदृष्ट्या अधिक चांगले काय करता येईल यासाठी नवीन धोरण आम्ही ठरवतोय. कृषी पर्यटनाचे धोरण निश्चित केले. आता बीच शॅक, होम स्टे बाबत स्वतंत्र धोरण ठरवतोय. तीन महिन्यात हे धोरण येईल. कोकणातील जनतेला पर्यटनवाढीसाठी या धोरणाचा निश्चित उपयोग होईल. Adityaji will call a meeting for Guhagar tourism development
Video पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
