आदित्य ठाकरेंची जाहीर सभा, शिवसैनिक तयारीला लागले
गुहागर, ता. 27 : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री Tourism Minister व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे Aditya Thackeray आज (29 मार्चला) सायंकाळी 5.30 वा. वेळणेश्र्वरला येत आहेत. Aditya Thackeray’s public meeting on Tuesday या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेना (Shiv Sena) करत आहे. ठाकरेंच्या स्वागताची तयारी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जि.प. सदस्य सौ. नेत्रा ठाकूर, तालुका प्रमुख सचिन बाईत यांच्या उपस्थितीत वेळणेश्वरमध्ये सुरु आहे.


युवासेना प्रमुख (Yuva Sena Chief) आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री (Tourism Minister Aditya Thackeray) म्हणून प्रथमच गुहागरमध्ये येत आहेत. त्याच्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Eduation Minister Uday Samant) , रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab), आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav), जिल्हा प्रमुख सचिन कदम व विलास चाळके देखील उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


Aditya Thackeray’s public meeting on Tuesday


महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शिवसेना विरुद्ध भाजप असे वातावरण चांगलेच तापले होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही आक्रमकपणे अनेकदा विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्याचप्रमाणे आरजीपीपीएल प्रकल्प, साखरीआगर जेटी, मुंबई गोवा महामार्ग आदी अनेक विषय आमदार जाधव यांनी विधानसभेत मांडले. या पार्श्र्वभुमीवर ठाकरे कुटुंबातील युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री गुहागरमध्ये येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची संधी आमदार भास्कर जाधव साधणार हे निश्चित आहे. Aditya Thackeray’s public meeting on Tuesday
गुहागर तालुक्यातील शिवसेना व युवासेनाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी गावागावातून उपस्थितीसाठी प्रयत्न करत आहेत. तवसाळ मार्गे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे येणार असल्याने तवसाळ ते वेळणेश्वर या मार्गावर भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. वेळणेश्वर गावात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या तयारीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव थांबले आहेत. जि.प. सदस्य सौ. नेत्रा ठाकूर, तालुका प्रमुख सचिन बाईत यांच्यासोबत आदित्य ठाकरेंच्या भव्य स्वागताची तयारी सुरु आहे. समुद्र किनाऱ्यावर भूमिपुजन आणि जाहीर सभेसाठी मंडप उभारण्यात आला आहे. उद्यापर्यंत वेळणेश्र्वर खारवीवाडी, बाजारपेठ, मंदिर परिसरात भगवे ध्वज, स्वागताचे फलक लावण्यात येणार आहेत. Aditya Thackeray’s public meeting on Tuesday