भूमि पॉटरी अँड क्ले स्टेशन येथे भेट व पहाणी
रत्नागिरी : उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे जिल्हा दौऱ्यावर असून त्या उद्या ८ रोजी गुहागर तालुक्यातील धोपावे गावाला भेट देणार आहेत.
ना. आदिती तटकरे यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. ०८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ०९.०० वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथून शासकीय वाहनाने धोपावे, ता. गुहागरकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता धोपावे येथे आगमन व भुमि पॉटरी अँड क्ले स्टेशन येथे भेट व पहाणी. (स्थळ : मु.पो. धोपावे, फेरी बोट जेट्टीजवळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी. सकाळी ११.०० वाजता धोपावे येथून शासकीय वाहनाने दापोलीमार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.