आजचा काळ हा डिजिटल माध्यमांचा आहे. जगात घडणारी कोणतीही घटना काही क्षणात आपल्याला हातात येवून पोचते. मात्र हातात आलेल्या माहितीची विश्र्वासार्हता किती याबाबत प्रश्र्नचिन्ह असते. हीच गोष्ट लक्षात घेवून आम्ही ‘गुहागर न्युज‘ हे डिजिटल माध्यम तयार केले आहे
आजचा काळ हा डिजिटल माध्यमांचा आहे. जगात घडणारी कोणतीही घटना काही क्षणात आपल्याला हातात येवून पोचते. मात्र हातात आलेल्या माहितीची विश्र्वासार्हता किती याबाबत प्रश्र्नचिन्ह असते. हीच गोष्ट लक्षात घेवून आम्ही ‘गुहागर न्युज‘ हे डिजिटल माध्यम तयार केले आहे. गुहागर तालुक्यातील घडामोडी, त्यावरील विश्र्लेषण, विविध कार्यक्रमांची माहिती आपल्याला येथे मिळेल. तालुक्यातील वृत्तांकनाबरोबर जिल्हा, राज्य आणि देश स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडीही आपल्याला येथे वाचायला मिळतील.
अचूक बातमी, विश्र्वासार्ह माहिती, बातमीमागचे विश्र्लेषण, यासोबत विविध माहितीची दालने वाचकांना येथे पहावयास मिळतील. बातमीची विश्र्वासार्हता जपतच एक सकारात्मक बदल घडविणारे हे नवे व्यासपीठ आहे. येथे बातमीसोबत समाजात निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांची माहिती देखील देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आज गुहागर न्युज या नावावे लावले छोटेसे रोपटे भविष्यात गुहागरातील विविध माहितीचा अद्ययावत स्रोत बनले ही आमच्या कामाची दिशा आणि ध्येय आहे.
गुहागर न्युजची स्थापना करणारे आम्ही गेली अनेक वर्ष पत्रकारीतेत आहोत. त्यामुळे पत्रकार म्हणून गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांसोबत आमचे अनेक वर्षांचे ऋणानुंबध आहेत. हीच आमच्या नव्या मार्गावरील शिदोरी आहे.
गुहागर न्युजचे शिलेदार
गणेश धनावडे
दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.
मनोज बावधनकर
वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.
मयूरेश पाटणकर
1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.