गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्य लेखनाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या संमेलनात गुहागर येथील जीवन शिक्षण शाळा गुहागर नं 1 चे शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे लिखित ‘आरसा’ कादंबरीस रावसाहेब नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
Dr. Babasaheb Ambedkar of Marathwada University The award for Outstanding Literary Writing was presented at the first Revolutionary Literary Convention held at the Main Theater.Written by Ishwar Halgare, teacher and writer of Jeevan Shikshan Shala Guhagar No. 1 in Guhagar The novel ‘Aarsa’ was awarded the Raosaheb Nathoba Dahiwal Outstanding Novel Writing Award. Rewards were in the form of cash, shawls, insignia.
सदर पुरस्काराचे वितरण संमेलनाध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक डॉ. हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त लघु व मध्यम उद्योग महाराष्ट्र राज्य यांचेसह डॉ. कांचन देसरडा, डॉ वाल्मीक सरवदे, डॉ राहुल मस्के, जयश्री सोनकवडे, पंकज बनसोडे आदी उपस्थित होते. यापूर्वी या कादंबरीला नाशिक येथील कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालयामार्फत दिला जाणारा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूरचा उत्कृष्ट कादंबरी लेखन हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर नायगाव (जि. नांदेड) येथील केवळबाई स्मृती कादंबरी पुरस्काराचे लवकरच वितरण होणार आहे.
‘आरसा’ ही कादंबरी मार्च 2021 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीत मुंबईतील डान्सबार व त्या अनुषंगाने येणारं चंगळवादाचं भीषण वास्तव आलेलं आहे. तसेच मराठवाडा आणि मुंबई यातील आर्थिक विषमता वाचकाला अंतर्मुख करते. कादंबरीच्या अशा वेगळ्या विषयामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.