नीलेश सुर्वे : वक्तव्याचा महाविकास आघाडी निषेध करणार का?
गुहागर, ता. 24 : भाजप (BJP) आमदार नितेश राणेच्या (MLA Nitesh Rane) सभागृहाबाहेरील कृतीवर अधिवेशनात चर्चा होते. मग देशाच्या पंतप्रधानांचा (Prime Minister) अपमान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडी चर्चा करणार का. असा प्रश्र्न आज गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी उपस्थित केला आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून गुहागरमध्ये भाजपने पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर सुर्वे पत्रकारांशी बोलत होते. BJP burnt statue of Patole in Guhagar
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले (Congress State President & MLA Nana Patole) यांनी महिन्याभराच्या कालावधीत दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (PM Narendra Modi) अपमानजनक उद्गार काढले. याचा निषेध म्हणून गुहागर भाजपने आज नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. BJP burnt statue of Patole in Guhagar गुहागर बाजारपेठ नाका येथे हा कार्यक्रम करताना भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुहागर भाजप (BJP) तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जागतीक सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील क्रमांक १ चे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून जाहीर करण्यात आले. अशा नेत्याविरुध्द सातत्याने अपमानास्पद भाषेत (inslut of PM Modi) बोलण्याचे काम पटोले करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी सभागृहाबाहेर केलेल्या कृतीवर राज्य सरकारच्या अधिवेशनात चर्चा होते. कमी कालावधीच्या अधिवेशनातही जनतेच्या समस्यांच्या चर्चेपेक्षा ही चर्चा रंगते. आता महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांच्या वक्तव्यावर सभागृहात चर्चा होणार का. त्यांनी केलेल्या विधानांना जाहीर विरोध महाविकास आघाडीने का केला नाही. असा प्रश्र्न सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्हाला पडला आहे.BJP burnt statue of Patole in Guhagar
पटोलेंच्या निषेध कार्यक्रमाला BJP तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, साईनाथ कळझुणकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा श्रध्दा घाडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष व नगरसेवक संजय मालप, भाजयुमो (BJYM) तालुका सरचिटणीस समीर गावणंग, शहराध्यक्ष संगम मोरे, महिला आघाडी शहरप्रमुख नेहा वराडकर, अमित जोशी, भाजयुमो शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, भाजप गटनेते उमेश भोसले, नगरसेविका सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, सौ. मृणाल गोयथळे, नगरसेवक गजानन वेल्हाळ, समीर घाणेकर, सौ. वैशाली मावळंकर, विजय मिशाळ, गणेश भिडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. BJP burnt statue of Patole in Guhagar