आमदार सदाभाऊ खोत, एस.टी. कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा
गुहागर, ता. 25 : सरकारने वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जे आजपर्यंत एस.टी. कर्मचाऱ्यांना जे मिळाले नाही ते या आंदोलनामुळे मिळाले. एक लढाई आपण जिंकली आहे. पहिल्या टप्प्यातील विजय हातात घेवून काही दिवस थांबावे. असा निर्णय आमदार पडळकर आणि मी घेतला आहे. आंदोलन एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. त्यामुळे हे आंदोलन पुढे किती काळ चालवायचे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी मुंबईत केले. विजय पचवायला मोठं मन लागत. आज जे नेते आमच्यावर आरोप करत आहेत ते यापूर्वी एकही दिवस आझाद मैदानात मुक्कामाला आले नव्हते. असा टोलाही त्यांनी टिकाकारांना हाणला. The government took a historic decision to increase wages. The S.T. workers got with this Statewide Strike; what they did not get in past. You have won a 1st stage of battle. Now this is time to wait. For the actual implementation of The pay hike announced by the government; You should wait a few days. Therefore MLA Padalkar and I have taken such a decision. ST Employees have started Statewide Strike. Therefore, they want to decide how long this strike will continue. This statement was made by MLA Sadabhau Khot in Mumbai. He also said, The mind has to be big to digest victory. The leaders who are accusing us today have never stopped at Azad Maidan. (Temporarily withdrawing the movement)


आझाद मैदानातील आंदोलन स्थगितीची घोषणा केल्यावर आमदार गोपीचंद पडळकर MLA Gopichand Padalkar आणि आमदार सदाभाऊ खोत MLA Sadabhau Khot यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार खोत म्हणाले की, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन मिळावे, वेळेवर वेतन व्हावे. सातवा वेतन आयोग लागु झाला पाहिजे. या मागण्यांकडे वर्षानुवर्ष सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. अशी भावना एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये (ST workers) निर्माण झाली. त्यातून राज्यव्यापी संपाला (Statewide Strike) सुरवात झाली. आझाद मैदानावर आम्ही आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला 15 दिवस लोटल्यानंतर शासनाला जाग आली. 24 नोव्हेंबरला या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात यश मिळाले आहे.
पहिल्या टप्प्यात यश मिळाले
राज्य सरकारने मुळ वेतनात भरघोस वाढ केली आहे. हा आंदोलनाचाच विजय आहे. याचा फायदा सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांनंतर मुळ वेतनात मोठी वाढ झाली आहे. एस.टी. महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दर महिन्यांच्या 10 तारखेच्या आत होण्यासाठी राज्य सरकार बांधील रहाणार आहे. महामंडळाला आर्थिक मदत करणार आहे. निलंबन आणि सेवा समाप्ती मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विलीनीकरणासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. तोपर्यंत कामगारांना दिलासा देण्यासाठी दोन पावलं सरकार पुढे आले ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलोय. न्यायालयाकडून जो निर्णय येणार आहे. त्याला काही कालावधी लागणार आहे. तो निर्णय आल्यावर दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन कर्मचाऱ्यांनी सुरु केले तर निश्चितच आम्ही त्यांना पाठिंबा देवू.
या राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजपने सर्व ठिकाणी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. या संपाला महाराष्ट्रातील जनतेची सहानभुती लाभली. एस.टी. कामगारांची मोठी ताकद सरकारला दिसून आली आहे. म्हणूनच ऐतिहासिक पगारवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे आम्ही आझाद मैदानात सुरु केलेले आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत. यापुढे सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही एस.टी.कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात आवाज उठवू.


कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहेच
कामगारांना, त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. राज्यातील आंदोलन हे एस.टी. कर्मचाऱ्यांनी सुरु केले होते. त्यामुळे त्या आंदोलनाचा निर्णय एस.टी. कर्मचारी घेतील. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी वेतन वाढ या आंदोलनामुळे झाली. या नंतरही काही संघटना आंदोलनावर ठाम आहेत. असे आम्हालाही समजतयं. आमची कोणतीही संघटना नाही. आम्ही या आंदोलकांचे सहानभुतीदार आहोत. आझाद मैदानावरील आंदोलन आम्ही सुरु केले होते. त्याठिकाणी एस.टी. कर्मचाऱ्यांना घेवून 16 दिवस आम्ही बसलो होतो. ते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

