मारुती होडेकर, त्या दृष्टीने शासकीय यंत्रणांनी तपास करावा
गुहागर, ता. 18 : नावेद 2 ही मच्छीमार नौका बेपत्ता होवून आज 20 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत बोटीचे अवशेष कोणालाही सापडलेले नाहीत. त्यामुळे या बोटीला अपघात झाला नसून अपहरण आणि घातपात झाल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासकीय यंत्रणांनी तपास करावा. अशी मागणी साखरीआगर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मारुती होडेकर यांनी केली आहे. The Naved 2 fishing boat went missing 20 Days ago. No wreckage of the boat was found during this period. Therefore, the boat was not crushed in Sea. There is a possibility of hijacking. Government agencies should investigate in that regard. Such a demand has been made by Maruti Hodekar, President of Sakhari Agar Fishermen’s Society.
Guhagar News जवळ बोलताना होडेकर म्हणाले की, आमचा अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता कोणत्याही नौकेला अपघात झाला असे गृहित धरले तर त्या नौकेचे अनेक अवशेष पाण्यावर तरंगत समुद्रकिनाऱ्याला येवून मिळतात. मच्छीमार नौकेवर प्लास्टीकचे क्रेट असतात. पकडलेली मासळी मोठ्या प्रमाण असते. डिझेल व पाण्याचे कॅन असतात. जाळी असतात. फायबर बोटीवरही लाकडाच्या फळ्या असतात. समुद्र कोणतीच वस्तू स्वत:जवळ ठेवत नाही. सर्व वस्तू कधी ना कधी बाहेर फेकल्या जातात. मात्र नावेद 2 ही मच्छीमार बोट बेपत्ता होवून आज 20 दिवस पूर्ण झाले तरीही कोकण किनारपट्टीवर बोटीचा एकही अवशेष आढळून आलेला नाही. त्यामुळे या बोटीबरोबर अपघात झाल्याचे चित्र रंगवले जात असले तरी ते खोटे आहे. या बोटीसोबत घातपात झाल्याची, बोटीचे अपहरण झाल्याची दाट शक्यता आहे.
याच कालावधीत पालघर जिल्ह्यातील एक मच्छीमाराला पाकिस्तानी सैनिकांनी समुद्रात गोळीबार करुन मारले. देवगड (जि. सिंधुदूर्ग) मधील एक बोट चोरीला गेली. या पार्श्वभुमीवर 26 ऑक्टोबरपासून घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे विश्र्लेषण होणे आवश्यक आहे. बोटीशी संबंधित सर्वांच्या फोन कॉलची तपासणी होणे आवश्यक आहे. आज एका कंपनीकडे बोट दाखवून काहीजण तपासाला वेगळे वळणं देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामागे या मंडळींचा काय उद्देश आहे. जर जयगड जवळ बोट बुडाल्याची चर्चा होत असेल तर बोटीवरील वस्तू कोणी गायब केल्या. का गायब करण्यात आल्या. पाण्यात बुडालेली बोट कोणी लपवून ठेवली आहे का. या गोष्टींचा तपास आणि खुलासा आजपर्यंत पोलीसांनी केलेला नाही. एकतर पोलीसांनी वस्तुस्थिती जाहीर करावी. अन्यथा उच्चस्तरीय तपास यंत्रणांनी अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करुन बोटीचा शोध घ्यावा. अशी मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत.