आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत
गुहागर, ता. 10 : कोरोना संकटानंतर अनेक शस्त्रक्रिया आता होवू लागल्याने देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी आंदोलनाच्या मनस्थितीत असणारे एस.टी. कर्मचारी रक्तदानासारखा स्त्युत्य उपक्रम घेतात. सामाजिक बांधिलकी जपणारे हे काम आदर्शवत आहे. असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातूंनी केले. ते गुहागर आगारातील रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. There is a shortage of blood in the country, as many surgeries are now being performed after the Corona crisis. In such a situation, ST Employees in the mood of Protest, undertake virtuous activity like blood donation. This work of social commitment is ideal. This statement was made by BJP district president and former MLA Dr. Vinay Natu. He was speaking on the occasion of inauguration of Blood Donation Camp at Guhagar Depot.


गुहागर आगारामधील दत्त मंदिरामध्ये संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सहभागी होण्यासाठी सुमारे 150 कर्मचारी आगारात उपस्थित होते. मात्र वेळेअभावी केवळ 65 कर्मचाऱ्यांना रक्तदान करता आले.


कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप (MSRTC statewide strike) सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. एकमेकांचे मनोधैर्य (Moral) टिकवून ठेवण्यासाठी गुहागर आगारातील संपकरी कर्मचारी (Protests) गेले दोन दिवस दत्त मंदिरात एकत्र येत आहेत. या वेळी सामाजिक बांधिलकीपोटी काही उपक्रम करु शकतो का अशी चर्चा झाली. या चर्चेतून संपकरी कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) घेण्याचा निर्णय घेतला.


बुधवारी (ता. 10) सकाळी 11 वा. आगारातील दत्त मंदिरात शिबिराचे उद्घाटन भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष (Disrtict President) व माजी आमदार (Former MLA) डॉ. विनय नातू जिल्हा रक्तपेढीच्या (District Blood Bank) वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत यांनी केले. दुपारी 3 वाजेपर्यत 65 कर्मचाऱ्यांना रक्तदान करता आले. वेळेची मर्यादा आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे इच्छा असुनही अनेक कर्मचाऱ्यांना रक्तदानात सहभागी होता आले नाही.
या शिबिरासाठी खाटा, गाद्या आदी साहित्य गुहागरमधील व्याडेश्र्वर देवस्थानने विनामुल्य उपलब्ध करुन दिले आहे. तर रक्तदानासाठी आलेल्या वैद्यकीय टीमची चहा, नाष्टा, जेवण यांची व्यवस्था दुर्गादेवी देवस्थाच्या सहकार्य करण्यात आली आहे. शिबिरासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी, राजे प्रतिष्ठान गोवळकोट आणि ग्रामीण रुग्णालय गुहागर यांनी साह्य केले. उर्वरित व्यवस्थांसाठीचा खर्च कर्मचाऱ्यांनी वर्गणीद्वारे उभा केला.
याबाबत विवेक गानू म्हणाले की, सणासुदीच्या काळात सातत्याने एस.टी. कर्मचारी संपावर जात असल्याने एस.टी.चा प्रवासीवर्ग नाराज आहे. पण त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करावा. संपूर्ण देश लॉकडाऊन असतान, खाण्यापिण्याची कोणतीही सोय नसताना एस.टी. कर्मचाऱ्यांनी अनेक अडकलेल्या प्रवाशांना थेट त्यांच्या राज्यात नेवून सोडले. आज आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. तरीही संप काळात सामाजिक बांधिलकीपोटी रक्तदानाचा उपक्रम आम्ही घेत आहोत.
संबंधित बातमी
डॉ. विनय नातूंनी गुहागरमधील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला विश्र्वास
व्हिडिओ न्यूज पहा.