• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपमान आणि दिलगीरी

by Mayuresh Patnakar
October 29, 2021
in Old News
16 0
0
अपमान आणि दिलगीरी

Nationalist Congress Party, State Presicdent Jayant Patil

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळ निघून गेल्यावर राष्ट्रवादीकडून सारवासारव

गुहागर, ता. 29 : राष्ट्रवादीच्या परिवार संवाद (Nationalist Congress Party) (Parivar Samvad) यात्रेदरम्यान गुहागरमध्ये पत्रकारांना (journalist) थेट व्यासपीठावरुन बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर आमंत्रीत करुन अपमान (insult) केल्याने संतापलेल्या पत्रकारांची दिलगिरी (apologies) व्यक्त करण्याचे सत्र सुरु झाले.  गुहागरच्या कार्यक्रमाची बातमी थेट राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाकडून (Public Relation Office) देण्यात आली. परंतू तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

गुरुवारी (ता. 28) परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) आणि जलसंपदा मंत्री (Maharashtra Cabinet Minister Water Resources) जयंत पाटील (Jayant Patil) गुहागरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी थेट व्यासपीठावरुनच पत्रकारांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. उपस्थित कार्यकर्त्यांच्या समोर अपमानास्पद वागणूक (insult) मिळाल्याने पत्रकार संतापले. सभागृहातून बाहेर पडलेल्या पत्रकारांची नाराजी दूर करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नुकतेच राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेशकर्ते झालेले गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल,  तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, प्रदिप बेंडल आदी अनेक पदाधिकाऱ्यांनी गुहागरच्या पत्रकारांची भेट घेतली. झाल्याप्रकाराबाबत दिलगिरी (apologies) व्यक्त केली. यावेळी आमचा तुमच्यावर राग नाही. तुम्ही दिलगिरी व्यक्त करण्याचा संबंध येत नाही. अशी भूमिका पत्रकारांनी घेतली.

खासदार तटकरेंकडूनही दिलगीरी (MP Tatkare also apologized)
परिवार संवाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्याचा शिष्टाचार (Protocol) स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती नसल्याने हा गोंधळ झाला. पत्रकारांना जाणिवपूर्वक अपमानित (insult) करण्याचा हेतू नव्हता. त्यांच्यावतीने मी दिलगीरी (apologies) व्यक्त करतो. असा निरोप स्वत: खासदार तटकरेंनी (MP Sunil Tatkare) पत्रकारांना दूरध्वनीवरुन दिला.

महिनाभरापूर्वी चिपळूणमध्ये पत्रकारांच्या उपस्थित झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नेत्यांमधील विसंवाद उघड झाला. त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट सभेत बसण्यास पत्रकारांना आडकाठी केली. परंतू परिवार यात्रेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पक्ष निरीक्षकांच्या सांगण्यावरुन गुहागर तालुकाध्यक्षांनी पत्रकारांना दिले होते.  घडल्या प्रकारामागील वास्तव समोर आल्यावर गुहागरच्या परिवार यात्रेची (Parivar Samvad Yatra) बातमी सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क विभागाची (Public Relation Office) धावपळ सुरु झाली. सुरवातीला ही बातमी गुहागरच्या पत्रकारांपर्यंत पोचविण्यात आली. मात्र ज्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो ती बातमी कशी द्यायची. असे सांगत अपमानित पत्रकारांनी बातमी देण्यास नकार दिला. म्हणून जिल्ह्यातील अन्य पत्रकारांपर्यंत बातमी पोचविण्याचे काम राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाने केले. परंतू गुहागरातील पत्रकारांच्या अपमानाची (insult) माहिती सर्वांपर्यंत पोचल्यामुळे ती बातमीच प्रसिध्द झाली नाही.

पत्रकार असे का वागले ? ( Why did the journalist act like that?)
पत्रकार (Journalist) हे विविध ठिकाणच्या बातम्या सर्वांपर्यंत पोचविण्याचे एक माध्यम (Media) असते. याचा फायदा राजकीय पक्ष (Political Parties) नेहमीच करुन घेत असतात. एखाद्या राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या प्रतिमा निर्मितीमध्येही (Image Building) पत्रकारांचा मोठा वाटा असतो. पत्रकारांच्या लेखणीमुळे एक वातावरण निर्माण होत असते. म्हणूनच राजकीय पक्षांना प्रत्येक कार्यक्रमात पत्रकार हवे असतात. याच भूमिकेतून गुहागरमधील परिवार संवाद यात्रेचे निमंत्रण पत्रकारांना अधिकृतरित्या देण्यात आले होते.

या कौटुंबिक कार्यक्रमाला पत्रकारांची उपस्थितीती अडचणीची वाटत होती तर संवादातून पत्रकारांना बाहेर थांबण्याची विनंती करता आली असती. अनेकवेळा अनेक ठिकाणी पत्रकारांना अशापध्दतीने ताटकळत थांबावे लागते. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग असतो. त्यामुळे गुहागरमधील पत्रकारही कार्यक्रम होईपर्यंत बाहेर थांबले असते. कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्षांबरोबर बोलण्याचे नियोजन करता आले असते. मात्र गुहागरच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या पत्रकारांना जाहीरपणे, स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाहेर जा असे सांगण्यात आले. याचा विपरित परिणाम पत्रकारांच्या प्रतिमेवर झाला. आमची आवश्यकता नव्हती तर बोलावलेच कशाला, आणि बोलावले तर मग अपमानित (insult) करुन सभागृहातून बाहेर का काढले. ही पत्रकारांची भूमिका आहे.

Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.