राजपुरे, कांगणे, जाधव, गोठण यांनी दिले पक्षपदाचे राजीनामे
दापोली मतदारसंघातील नेतृत्वाबरोबर आम्ही काम करणार नाही. अशी ठाम भूमिका घेत राजपुरे, कांगणे, जाधव आणि गोठण यांनी शिवसेनेमधील पदांचे राजीनामे दिले आहेत. संदीप राजपुरे यांनी मंगळवारी (ता. २६) दापोलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या वेळी शंकर कांगणे, विकास जाधव उपस्थित होते. We will not work with the leadership in the Dapoli constituency. Taking such a firm stand, Rajpure, Kangane, Jadhav and Gothan have resigned from their posts in the Shiv Sena. This information was given by Sandeep Rajpure while holding a press conference in Dapoli on Tuesday (26). Shankar Kangane and Vikas Jadhav were present at this time.
संदीप राजपुरे हे शिवसेनेचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख आहेत. शंकर कांगणे यांच्याकडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख असे पद आहे. विकास जाधव हे दापोली तालुक्याचे युवा सेना उप तालुका अधिकारी आहेत. तर दत्ताराम गोठण हे खेड तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत.


पत्रकार परिषदेत बोलताना संदीप राजपुरे म्हणाले की, आम्ही शिवसेनेवर नाराज नाही, मात्र नेतृत्वात समाज भावना नाही असे नेतृत्व समाजाच्या काय हिताचे. मी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख असतानाही मला ओळखले जात नाही. इतक्या वर्षात समाज हिताचे एकही काम नाही. फक्त निवडणुका आल्या की आपल्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करून घेतला जातो.


शंकर कांगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुणबी समाजातील नेत्यांना हीन वागणूक दिली जाते. सतत अपमानित केले जाते. हे आता कुणालाही सहन होण्यासारखे नाही त्या मुळे भविष्यात आमचं नेतृत्व आम्हीच उभे करणार आहोत.