(भाग 14)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
मधुमेहामध्ये आहाराचे महत्त्व अत्यंत आहे.योग्य आहारामुळे मधुमेही तसेच pre-diabetic बालमधुमेही व गरोदरपणात उत्पन्न होणारा मधुमेह हि आटोक्यात येतो. रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवली जाते. वजन योग्य प्रमाणात राहण्यास हि मदत होते. मधुमेही रुग्णांच्या प्रकृती नुसार आणि मधुमेहाच्या प्रकारानुसार आहाराचे स्वरूप अवलंबून असते.
फक्त मधुमेही माणसाला फक्त मधुमेहच असेल, असं नाही तर त्याच्या जोडीला ब्लड प्रेशर असू शकते, अत्याधिक ओबेसिटी असू शकते. म्हणजेच लट्ठपण असू शकतो, रक्तवाहिन्यांचे आजार असू शकतात, लखवा असू शकतो, अशा वेगवेगळया गोष्टी असू शकतात. त्या अनुशंगाने त्याचा आहार ठरवला जातो. लट्ठ माणसाला आहार वेगळा आणि बारीक माणसाला आहार वेगळा जस आपण आमच्या लेखात पाहिलेलं आहे कि मधुमेहाचे प्रकार त्यात लट्ठ माणसाणाहि असतो आणि बारीक माणसाणाहि असतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी योग्य औषधे व आहार नियमित व्यायाम आणि नियमित तपासणी हि चार सूत्र पाळली, तर मधुमेह हि उत्तम स्थितीत राहतो व कोणतेही आजार जवळ येत नाहीत.
मधुमेही माणसाचा सामान्यपणे आहार कसा असावा?
आहारात तंतुयुक्त आहार म्हणजेच फायबर्स अधिक असावेत. फॅट्स आणि साखरेचे पदार्थ अजिबात नसावेत. फॅट्स थोडेफार चालतील, पण साखरेचे पदार्थ शून्य असावेत. पदार्थ खाताना आपल्या हातात मोबाईल असतोच, त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे हे बघून पदार्थ खावेत. साधारण पणे 0 ते ५० ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ आहारात असावेत. त्यावरचे पदार्थ आहारात नसावेत. ७० च्या पुढचा कोणताही पदार्थ आहारात नसावा. ५०ते ७० थोड्या प्रमाणात खाल्लेले चालते.
आहारात विशेष म्हणजे प्रत्येक पदार्थाच रुपांतर हे स्टार्च मध्ये होत. परिणामी साखर तयार होते. आणि त्याचे रुपांतर उर्जेत होत,आणि ती उर्जा वापरली जाते. ही क्रिया मधुमेही लोकांत क्षीण असते. त्याच्यामुळे आहार नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी Join Diabetic Club वर क्लिक करा.
(Part 13…..)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात
भाग ८ : शरिरातील साखरेची तपासणी
भाग 9 : समजून घ्या HBA1C चाचणी
भाग 10 : मधुमेहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
भाग 11 : मधुमेहींवर उपचार करताना…
भाग 12 : मधुमेहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम
भाग 13 : मधुमेहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम (३)
Diabetes, Apex Hospital, Ratnagiri, Lifestyle, Diabetic, जनजागृती, Awareness, मधुमेह, मधुमेही, sugar test, साखरेची तपासणी, Health, आरोग्य, जीवनशैली, Treatment, Diet,