शासनाची मान्यता : 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
गुहागर, ता. 15 : चिपळूण तालुक्यातील रिगल एज्युकेशन सोसायटीच्या (Regal Education Society) शृंगारतळीतील रिगल कॉलेजला शासनाची मान्यता मिळाली आहे. (Government Approved Regal College in Shringartali) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया (Admissions) सुरु झाली आहे. या कॉलेजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अन्यत्र उपलब्ध नसलेल्या बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन (Business Administration), संस्कृत विशारद (Sanskrit Visharad), Public Administration (लोकप्रशासन), इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) असे हटके विषय (Courses) शिकवीले जाणार आहेत.
2007 मध्ये रिगल एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. गुहागर चिपळूण मार्गावरील कोंढे येथे हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड टुरिझम (Hotel Management & Tourism) , हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (Hospitality Management), फॅशन डिझायनिंग (Fashion Designing) सारख्या व्यावसायिक (Commercial) , कौशल्य विकासावर (Skill Development) आधारीत अभ्यासक्रम या महाविद्यालयात सुरु झाले. शिक्षणानंतर स्वयंरोजगार (Self Employment) किंवा नोकरीची (Employment) संधी उपलब्ध होत असल्याचे रिगल कॉलेजला अल्पावधीतच जनमान्यता मिळाली. आज रिगल एज्युकेशन सोसायटीची महाड, लांजा, कणकवली, सोलापूर, कल्याण या सहा ठिकाणी महाविद्यालये (Six Braches at Mahad, Lanja, Kankavli, Solapur, Kalyan) सुरु झाली आहे. हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत.
शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रिगल कॉलेज (Regal College, Shringartali) सुरु करण्यात आले आहे. या महाविद्यालयात 100 टक्के नोकरी, व्यवसायाची हमी असणारे बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन (Business Administration), संस्कृत विशारद (Sanskrit Visharad), Public Admistration (लोकप्रशासन), इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management), कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (BCA), असे विविध कोर्स शिकवले जाणार आहेत.
Diploma in Event Management
आज डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम केवळ मुंबई, पुणे आदी शहरातून उपलब्ध आहे. कल्पकता, कार्यक्रमाची व्याप्ती, त्याचे व्यवस्थापन यांचे शिक्षण या अभ्यासक्रमात मिळते. कार्पोरेट इव्हेंट, शासकीय कार्यक्रम, राजकीय सभा, विविध समारंभ कसे यशस्वी करावेत. याचे शिक्षण मिळते. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन महोत्सव, आमदार चषक, आयपीएल, प्रो कबड्डीच्या धर्तीवरील स्पर्धा, मनोरंजनाबरोबर खाद्य जत्रा आणि विविध वस्तुंची विक्री करणारे महोत्सव असे अनेक इव्हेंट (कार्यक्रम) होतात. मात्र त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील आस्थापनांना काम दिले जाते. रिगल कॉलेजच्या इव्हेंट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमामुळे येथील तरुणांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लगेचच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इव्हेंट प्लॅनर, इव्हेंट मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी अशा स्वरुपाच्या नोकऱ्याची संधीही उपलब्ध आहे.
M.A. in Public Admistration
कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. चार सेमीस्टरचा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये शासन, समाज व स्थानिक प्रशासन या संबंधीचे सखोल ज्ञान, केंद्र शासन व राज्य शासनामधील प्रशासकीय रचनेचा अभ्यास तसेच आर्थिक नियोजन व व्यवस्थापन या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी, प्रशासकीय सेवा, प्रशासकीय कायदेशीर सल्लागार, कार्पोरेट कंपन्यांमध्ये प्रशासकीय व्यवस्थापक, मार्केटींग मॅनेजर, एच. आर. मॅनेजर म्हणून नोकरी मिळू शकतो. तसेच प्राध्यापक, संशोधक म्हणूनही संधी आहेत.
बी.ए. विशारद (संस्कृत)
रत्नागिरी जिल्ह्यात हा पदवी अभ्यासक्रम प्रथमच शिकविला जाणार आहे. यामध्ये संस्कृत साहित्य, व्याकरण, कविता, नाटके, कादंबरी यांचा अभ्यास समाविष्ट आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे शिक्षक, संस्कृत विषयाचा दूभाषा, संस्कृत साहित्याचा अभ्यास केल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये नोकरीची संधी आहे.
गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आजच्या काळात संधी असलेले अभ्यासक्रम रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये शिकविले जाणार आहेत. स्वाभाविकच परगावी जावून असे अभ्यासक्रम शिकण्यासाठी होणारा खर्च वाचणार आहे. त्यामुळे लगेचच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह अशा अभ्यासक्रमांकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील शृंगारतळीतील तौहिद मॉलमधील महाविद्यालयाला भेट द्यावी. असे आवाहन रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे.
Government Approved Regal College in Shringartali
Regal College in Shringartali has received government approval. Admission process has started in this college for the academic year 2021-22. In this college, Subjects like Business Administration, Sanskrit Visharad, Event Management, Public Administration which are not available elsewhere in Ratnagiri district will be taught.