(भाग 11)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
अपेक्स हॉस्पीटलमध्ये काम करीत असताना एक दहा वर्षाची मुलगी बेशुद्ध अवस्थेत आली होती. तिला करोना असल्याने ती अॅडमिट झाली होती, परंतु अनेक तपासण्यानंतर लक्षात आले की, तिला मधुमेह आहे. त्याचा उलगडा अपेक्सला येऊनच झाला. तिचे HBA1C ११.३० होते आणि साखर ४०० च्या पुढे होती. रक्तातील बायकोरोबो लेव्हल कमी झाली होती. क्षार संतुलन बिघडले होते. दम लागलेला होता. पीएच बदलेला होता. आम्ही डायबेटिक केटोएसिडोसिसचे उपचार चालू केल्यानंतर ती ठणठणीत बरी होऊन घरी गेली.
रक्तातील साखर खूप वाढणे
(हायपरोस्मोलर केटोन बॉडीज न वाढता येणारी बेशुद्धी)
ज्यांच्यात मधुमेहाचे निदान केले गेले नाही अशा दुर्लक्षित व्यक्तीमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.
दारू पिणे, रोगप्रतिकारक औषधे, डाययुरेटीक औषधे, क्लोरप्रोमाझिन सारखी औषधे यांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा हायपरग्लासेमिया सापडतो. यातही बेशुद्ध अवस्था दिसते.
रक्तातील साखर अगदी कमी होणे (हायपोग्लासेमिया)
शरीरातील साखरेचे प्रमाण ७० पेक्षा खाली गेल्यास हा हायपोग्लासेमिया दोन प्रकारात दिसतो.
१) रक्तातील इन्सुलिन खूप जास्त होणे. स्वादुपिंडास गुल्म झाल्यास इन्सुलीनोमा हे दिसून येते.
२) रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य असते परंतु त्यावर नियंत्रण करणारी इतर होर्मोन (अंतस्त्राव) कमी असतात व त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित होत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी Join Diabetic Club वर क्लिक करा.
(Part 11…..)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
https://guhagarnews.com/my-journey-towards-diabetes/
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात https://guhagarnews.com/tests-for-diabetes/
भाग ८ : शरिरातील साखरेची तपासणी
https://guhagarnews.com/body-sugar-test/
भाग 9 : समजून घ्या HBA1C चाचणी
https://guhagarnews.com/hba1c-test/
भाग 10 : मधुमेहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
https://guhagarnews.com/effects-of-diabetes/
Diabetes, Apex Hospital, Ratnagiri, Lifestyle, Diabetic, जनजागृती, Awareness, मधुमेह, मधुमेही, sugar test, साखरेची तपासणी, Health, आरोग्य, जीवनशैली, Treatment,