• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अतिक्रमण हटाव कारवाई होवू देणार नाही

by Mayuresh Patnakar
October 6, 2021
in Old News
16 0
1
अतिक्रमण हटाव कारवाई होवू देणार नाही
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगराध्यक्ष राजेश बेंडल, समुदकिनाऱ्यावरील खोकेधारकांचे पर्यटन विकासात योगदान

गुहागर, ता. 6 : पर्यटन विकासामध्ये योगदान असणाऱ्या आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या खोकेधारकांवर अतिक्रमणाची कारवाई होवू देणार नाही. असा विश्र्वास गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आज गुहागर न्यूजजवळ व्यक्त केला. इतके वर्ष कोणतीही कारवाई न करणाऱ्याला मेरीटाईम बोर्डाला अचानक हा विषय कसा आठवला असाही प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला आहे. Encroachment action will not be allowed on those coastal shopkeepers, who contribute to the development of tourism and provide employment to the locals. This belief was expressed by Guhagar Nagar Panchayat Mayor Rajesh Bendal with Guhagar News today. He also raised the question of how the Maritime Board, which has not taken any action for so many years, suddenly remembered the issue.

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील विक्रेत्यांनी बांधलेली अनधिकृत बांधकामे (Unauthorized construction) हटवावीत. अशी नोटीस मेरीटाईम बोर्डाद्वारे देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, गुहागर नगरपंचायतीने पथदिप व हायमास्क दिवे लावण्यासाठी उभ्या केलेल्या खांबांचा पाया धूप झाल्याने उघडा पडला आहे.  त्या खांबांचे संरक्षण व्हावे म्हणून मेरीटाईम बोर्डाकडे गुहागर नगरपंचायतीने परवानगी मागितली आहे. ही परवानगी अजून मिळालेली नाही. गेली अनेक वर्ष किनाऱ्याची धूप होत असल्याने सुरू पडत आहेत. ही धूप थांबविण्यासाठी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर शासनाने धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांसारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या सर्वाकडे मेरीटाईम बोर्डाचे लक्ष आहे का असा प्रश्र्न पडतो. हे खोकेधारक स्वत:चे दुकानाचा समुद्राच्या लाटांपासून बचाव व्हावा म्हणून दरवर्षी स्वखर्चाने काही ना काही उपाय योजना करत आहेत. म्हणून या परिसरातील सुरूबन टिकून आहे. हे ही लक्षात घेण्याची गरज आहे.

संबधित बातमी : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

याउलट गुहागरातील पर्यटन विकासामध्ये समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या खोकेधारकांचे योगदान आहे. हे विसरुन चालणार नाही. गुहागरचा समुद्रकिनारा स्वच्छ (Clean Beach) करण्याचे काम हे खोकेधारक करतात. जीवरक्षक नव्हते त्यावेळी पर्यटकांना सूचना देण्याचे काम हे खोकेधारकच करत होते. जीवरक्षकांना (Coastal Lifeguard)मानधन देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीला शासनाकडून निधी मिळत नव्हता.  त्यावेळी गुहागरातील सामाजिक संस्था, देवस्थाने, पर्यटन व्यावसायिकांबरोबरच या खोकेधारकांनीही नगरपंचायतीला आर्थिक मदत केली आहे. हे विसरून चालणार नाही.

कोरोना महामारीनंतर बेरोजगारी (Unemployment) ही सामाजिक समस्या बनली आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. मार्च 2020 पासून कोरोना संकटात घालेल्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय थांबला. तीन मोठे पर्यटन हंगाम हातातून गेले. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांबरोबरच हे छोटे खोकेधारकही आर्थिक संकटात आहेत. या पार्श्र्वभुमीवर मेरिटाईम बोर्डाकडून अतिक्रमण हटाव अंतर्गत काढलेल्या नोटीसी चुकीच्या आहेत. गुहागर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष म्हणून मी या कारवाईच्या विरोधात आहे. कारवाईच्या ऐवजी या खोकेधारकांनी दिलेल्या भाडेपट्ट्यांच्या प्रस्तावावर मेरिटाईम बोर्डाने तातडीने कार्यवाही करावी. त्यातून शासनाला उत्पन्न मिळेल. अशी विनंती मी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना करत आहे.

Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.