(भाग 9)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
मधुमेहावर उपचार करताना बऱ्याचवेळा HBA1C चाचणी केली जाते. या चाचणीचे महत्त्व काय हे आपण आजच्या भागात जाणून घेवू या.
HBA1C चाचणीमुळे….
१. चार महिन्यात डायबेटीस नियंत्रणात आहे का हे कळते.
२. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट पेशंट याला खरोखरच डायबेटीस आहे का कि तात्पुरती साखर वाढली आहे हे याच टेस्ट ने कळते.
३. उपचार आहे तेच ठेवावे, औषधे बदलावी का? कि कमी करावीत याचा निर्णय डॉक्टरांना घेता येतो.
४. प्रसुती दरम्यान गर्भ विकृतीचे निदान करण्यास उपयोगी येते.
५. डायबेटीस चे १००% अचूक निदान याच टेस्ट द्वारे होते.
त्यामुळे ही चाचणी डॉक्टरांना आवडते.
HBA1C चं का ?
१. तुमचा मधुमेह म्हणजेच रक्तशर्करा ३ ते ४ महिने नियंत्रणात आहे का हे अचूकपणे दाखवतो
२. हि तपासणी अत्यंत अचूक याचे कारण
ए- कोणत्याही वेळी तपासून चालते. जेवून अथवा उपाशीपोटी ही चालते.
बी- व्यायाम करूनही केली जाते.
३. नुकतेच डायबेटीसचे औषध घेतले असले तरीही चालते.
हे पण लक्षात ठेवावे
HBA1C खालील आजारामध्ये डायबेटीस नियंत्रणाखाली असताना सुद्धा जास्त येऊ शकते.
१. पंडुरोग आयर्न डेफ़िशिअन्सि अॅनेमिया
२. हिमोग्लोबिनोपाथीस- सिकल सेल अॅनेमिया
३. रक्तातील ट्रायग्लीसरायिड्स वाढली असता
४. रक्तातील बिलिरुबिन वाढली असता
५. युरेमिया दारुड्या लोकांच्या व सॅलिसायक्लेट खाणाऱ्या लोकांच्या
मधुमेह असताना नियंत्रणात नसताना HBA1C कमी प्रमाणात खालील रोगात दाखवते:
१ मलेरिया, थॅलिसिमिया , प्लीहेची अतिकार्य होणे
२ अत्याधिक रक्तस्त्राव
३ नुकतच रक्त दिल गेल असल्यास
रक्ताशिवाय रक्तातील साखर मोजणारे यंत्र


साखर लाळेतून , श्वासातून, अश्रूतून देखील मोजता येते. अलीकडे इंपिडन्स स्पेक्ट्रोस्कोपी, मॅग्नेटीक रेझोनन्स इमेजिंग व इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्हजचा वापर करून हे नवे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.
अश्रूतील साखरेचा सुगावा लागेल अशी संपर्क भिंगे (contact lenses) आता शोधण्यात आली आहेत.
श्वासोच्छवासातून साखरेचा शोध घेतला जात आहे. निरोगी व्यक्तीच्या श्वासातील अॅसीटोनचे प्रमाण १ ते२ मि. ग्रॅ./ डीएल यापेक्षा जास्त आढळत नाही. मधुमेही रुग्णात हेच प्रमाण ८ ते १० मि. ग्रॅ./ डीएल एवढे वाढलेले आढळते. मेटॅबोलिक हिट कंन्फ्रटेशन पद्धतीत शरीरातील उष्णता व प्राणवायूचे प्रमाण यावर आधारित साखरेची पातळी मोजतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी Join Diabetic Club वर क्लिक करा.
(Part 9…..)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
https://guhagarnews.com/my-journey-towards-diabetes/
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात https://guhagarnews.com/tests-for-diabetes/
भाग ८ : शरिरातील साखरेची तपासणी
https://guhagarnews.com/body-sugar-test/