(भाग 8)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
मधुमेह झाला आहे का हे पहाण्यासाठी शरिरातील साखरेचे प्रमाण बिघडले आहे का हे तपासावे लागते. म्हणूनच आजच्या लेखमालेत शरिरातील साखरेच्या तपासणीची माहिती घेवूया.
1. फास्टींग ब्लड सँपल – उपाशिपोटी केलेली रक्तातील साखरेची तपासणी
2. जेवणानंतर रक्तातील साखरेचा नमुना (POST PRANDIAL)
3. लघवीत साखर आहे का?
पूर्वीच्या काळी डायबीटीसच्या तपासणीसाठी लघवीतील साखरच जास्त वेळा तपासली जायची परंतु, लघवीतील साखर वाढली की ती मधुमेहीच असे मात्र नाही. लघवीत साखर सापडल्यास त्याला GLYCOSURIA म्हणतात. अशा व्यक्तींमध्ये काही वेळा रक्तात साखर सापडत नाही. लघवीत साखर आहे परंतु रक्तात नाही अशा अवस्थेला RENAL GLYCOSURIA म्हणतात. अशा व्यक्तींनी तज्ञ डॉक्टर कडे जाऊन सतत डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रहावे.
4. ओरल ग्लुकोज टॉलरंस टेस्ट (ORAL GLUCOSE TOLERANCE TEST)
हि तपासणी पेशंटला मधुमेह होण्याची शक्यता आहे का हे कळण्यासाठी केली जाते. मधुमेह पूर्व रुग्ण अथवा गर्भधारणा काळातील मधुमेह ओळखण्यासाठी केली जाते. या तपासणीमध्ये
A. पेशंटला १०० ग्रॅम ग्लुकोज दिला जातो व दर अर्ध्या तासांनी ६ वेळा रक्तातील साखर तपासली जाते.
पेशंटची १ तासानंतर १८० mg /dl पेक्षा जास्त आढळल्यास ३ तासानंतर १४० mg/dl पेक्षा जास्त सापडल्यास पेशंट मधुमेह पूर्व रुग्ण आहे, असे समजते.
B. दुसरी पद्धत आधी ७५ ग्रॅम ग्लुकोज कधीही द्या व २ तासांनी रक्त तपासतात त्यात १४० अथवा जास्त सापडल्यास मधुमेहाचे निदान होते.
C. गर्भधाराकाळातील मधुमेह सुद्धा यानेच कळतो. c –peptide assay या तपासणीमध्ये शरीरात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कळते. इन्सुलिन पेशंटला चालू करावे का ? हे या टेस्टने कळते.c-peptide हे A आणि B चैन प्रो इन्सुलिनच्या मालिकेला चिकटते व वापरले जाते. म्हणजेच c-peptide हा इन्सुलिन प्रोडक्शन चा मार्कर आहे.
5. आयलेट सेल अँन्टीबॉडिज
हि चाचणी TYPE 1 डायबेटीस शोधण्यासाठी केली जाते. इन्सुलिन डीपेन्डेट असणाऱ्या पेशंटची हि पोझीटिव्ह येणे अपेक्षितच आहे.
6. GAD antibodies test
GAD सेलना अॅंटीबॉडीज नष्ट करतात type I डायबेटीस मध्ये हि टेस्ट positive येते.
7. जनुकीय दोषासाठी विविध तपासण्या जनुकीय प्रयोगशाळेत केल्या जातात. `
8. Glycosylated Hemoglobin TEST (ग्लायकॉसायलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट )
रक्तातील ३ महिन्यातील साखरेची पातळी कशी आहे याचा इंडेक्स याने मिळतो. सामान्यपणे 7 च्या खालीही हवी.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. (फक्त रुग्णांनीच या क्लबमध्ये जॉईन व्हावे.)
https://chat.whatsapp.com/LY9G7rMdN9l12gO887tmtz
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
https://guhagarnews.com/free-camp-for-diabetic-patients-at-apex-hospital-ratnagiri/
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
https://guhagarnews.com/my-journey-towards-diabetes/
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात
https://guhagarnews.com/tests-for-diabetes/