२२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात रुग्णांची मोफत तपासणी शिबिर
रत्नागिरी : येथील अपेक्स हॉस्पीटलने डायबेटिक (मधुमेह) क्लब सुरू केला आहे. समाजात या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांचे प्रबोधन करण्यासाठी क्लब काम करत आहे. याअंतर्गत येत्या बुधवारपासून (ता. २२) पूर्णतः मोफत शिबिराचे नियोजन केले आहे.
Apex Hospital, Ratnagiri has started a Diabetic Club. As the number of these patients in the society is increasing, the club is working to enlighten them. Through this Diabetic Club, a completely free camp has been planned from next Wednesday (22nd September to 5th October ).
अपेक्स हॉस्पीटलने कोविड रुग्णालय म्हणून गेले दीड वर्षे सेवा बजावली. आता रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नॉन कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे डायबेटिक क्लबच्या शिबिरामध्ये तुमचे प्रश्न व आमची उत्तरे दिली जातील. नोंदणी करून डायबेटीक कार्ड दिले जाईल. याद्वारे डायबेटीसमुळे कोणताही उद्भवणारा प्रसंग यासाठी तत्काळ उपचार मिळतील. मोफत औषधोपचार केले जातील. प्रत्येकाची ब्लड शुगर, इ.सी.जी., बॉडी मास इंडेक्स, बेसल मेटाबोलिक रेट, बॉडी सरफेस एरिया, ब्लड प्रेशर, पल्स ऑक्सिमेट्री, पायाची संवेदना व रक्तवाहिन्यांची तपासणी केली जाईल. या प्राथमिक तपासण्या शिबिरात केल्या जातील. दररोज फक्त पन्नास रुग्णांनाच नोंदणी करून सहभागी होता येईल.
In this Free Camp, Diabetic card will be issued by registration. This will provide immediate treatment for any eventuality caused by diabetes. Free medication. Also preliminary check-up i.e. blood sugar, ECG, body mass index, basal metabolic rate, body surface area, blood pressure, pulse oximetry, foot sensation and blood vessels; will be done at the camp. All the questions of the diabetic patient will be answered satisfactorily in the Diabetic Club camp. Only fifty patients can register and participate every day.
नोंदणीसाठी अपेक्स हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. नोंदणीसाठी मोबाईल नंबर 8482948439 या नंबरवर फोन करावा. हे शिबिर ५ ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. पहिल्या शिबिरानंतर पुढील महिन्यात दुसरे शिबिर होईल. हे शिबीर पूर्णपणे मोफत असेल, अशी माहिती अपेक्स हॉस्पीटलतर्फे देण्यात आली.