महेंद्रसिंग धोनी मार्गदर्शक, बीसीसीआयने दिली माहिती
ऑक्टोबरमध्ये युएई व ओमानमध्ये सुरु होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्र्वचषक स्पर्धेसाठी (ICC T-20 World Cup) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीकडे भारतीय संघाचे कर्णधार पद सोपविण्यात आले आहे. क्रिकेटमधील कसोटी, एक दिवसीय, टी -20 या तीन्ही प्रकारात भारताला अजिंक्य पद मिळवून देणारे महेंद्रसिंग धोनी या स्पर्धेत भारतीय संघाचा मार्गदर्शक या भूमिकेत दिसणार आहे. अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.


टी-20 विश्र्वचषकासाठी भारताचा संघ


बीसीसीआयने 18 खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी केली आहे. त्यामध्ये 15 मुख्य खेळाडू आणि 3 राखीव खेळाडू आहेत. मुख्य संघात 5 फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे.
मुख्य संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर


विश्वचषकातील भारताचे सामने
विश्र्वचषकाच्या गट क्रमांक 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्युझीलंड आणि अफगाणीस्तान हे चार संघ आहेत. तसेच पात्रता फेरीमधून आणखी दोन संघ या गटात सामील होणार आहेत. भारताचा 1ला सामना 24 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होईल. 2 सामना न्युझीलंड सोबत 31 ऑक्टोबरला, 3 रा सामना अफगाणिस्तान विरुध्द 3 नोव्हेंबरला, तर 5 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरला पात्रता फेरीमधुन या गटात सामिल झालेल्या 2 संघांबरोबर सामने होतील.
टी-20 विश्र्वचषकाचे सामने दुबई, अबुधाबी, शारजाह आणि ओमान येथे खेळवले जाणार आहेत.


The Board of Control for Cricket in India (BCCI) has announced the Indian squad for the ICC T-20 World Cup to be held in the UAE and Oman in October. Virat Kohli has been named captain of the Indian team. Mahendra Singh Dhoni, who has helped India win all three categories of Tests, ODIs and T20s, will be seen as the Mentor for the Indian team in the tournament. This information has been given by BCCI secretary Jai Shah.