नारायण राणे, नाहीतर मी केस दाखल करेन
चिपळूण, 24 : मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, नाहीतर मी केस दाखल करेन, अशा शब्दात नारायण राणे यांनी आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर जनआशिर्वाद यात्रेचा नियोजीत दौरा सुरु झाला. बहादूरशेख नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेबर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जनआशिर्वाद यात्रा पुढील कार्यक्रमांसाठी मार्गस्थ झाली.

