गुहागर : गुहागर तहसील कार्यालयाच्या नूतन तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे गुहागर शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे, माजी नगरसेवक सिद्धिविनायक जाधव, युवासेना तालुकाअधिकारी अमरदीप परचुरे, युवासेना शहरअधिकारी राकेश साखरकर, विभागप्रमुख शरद यादव, विरेश बागकर आदी उपस्थित होते.