शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस (आय), स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करणाऱ्या नारायण राणेंना अखेर भाजपाने केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री (सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय) बनवून आपला शब्द खरा केला आहे. Narayan Rane is now Cabinet minister of Micro, Small and Medium Enterprises Ministry. MSME सुमारे चार वर्ष सत्तेच्या चौकटीपासून दूर रहाणाऱ्या या नेत्याचा नवा राजकीय प्रवास नेमका कसा असेल. राणेंच्या आक्रमकतेला मिळालेली सत्तेची जोड महाराष्ट्रातील सत्ताकारणावर काय परिणाम करेल. याच प्रश्र्नांची उत्तरे मिळायला थोडा कालावधी जावा लागेल. मात्र राणेंना मंत्रीमंडळात घेवून शिवसेनेबरोबर पुर्वीसारखी तडजोड यापुढे होणार नाही यांचे संकेत थेट मोदी शहांनीच देवून टाकले आहे.
नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे आक्रमक राजकारणी. शासकीय नोकरीवर लाथ मारुन त्यांनी आपला राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु केला. 1985 ते 1999 या 14 वर्षांच्या कालखंडात शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री ( Shakha Pramukh to Maharashtra Chief Minister) असा चढत्या क्रमाने प्रवास नारायण राणे यांनी केला. अवघे 9 महिने मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर झालेल्या राज्याच्या निवडणुकांमध्ये युतीची सत्ता गेली. तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackray)) यांनी नारायण राणेंवर विश्र्वास दाखवत विरोधी पक्षनेतेपद बहाल केले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या राजकीय वादामुळे नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
2005 साली काँग्रेस (आय) (Congres) मध्ये प्रवेश केल्यानंतर उद्योग मंत्री, महसुल मंत्री (Industry Minister, Revenue Ministerअशी महत्त्वाची खाती त्यांना देण्यात आली. परंतु काँग्रसच्या विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), अशोक चव्हाण (Ashok Chavan) , पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या तिनही मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांना फारसे जुळवू घेता आले नाही. अखेर सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. 12 वर्षांच्या या राजकीय कारकीर्दीमध्ये नारायण राणेंसारख्या आक्रमक नेत्याला अनेकदा दरबारी राजकारणाचा फटका बसला. सिंधुदूर्गमधुन डोळे झाकून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या नारायण राणेंना आपल्याच मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मुंबईच्या पोटनिवडणुकीतही दुसऱ्यांदा पराभवाची चव चाखावी लागली.
ऑक्टोबर 2017 मध्ये नारायण राणेंनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. परंतु अवघ्या वर्षभरात या पक्षाचे अस्तित्व संपवले. 2018 मध्ये भाजपच्या पाठींब्यावर ते राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हापासून अनेक वेळा नारायण राणेंच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यामध्ये शिवसेना विरोधाचा अडसर होता. अखेर ऑक्टोबर 2019 मध्ये कणकवलीत (जि. सिंधुदुर्ग) तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत नारायण राणे आणि कुटुंबिय भाजपमध्ये प्रवेश कर्ते झाले. यावेळी भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळेल या शब्द देण्यात आला होता.
भाजपने हा शब्द पाळला. 2019 च्या निवडणुकीत नितेश राणे हे एकमेव भाजप आमदार कोकणातून निवडून आले. माजी खासदार निलेश राणे यांना भाजप प्रदेश कार्यकारीणीत मानाचे स्थान मिळाले. फेब्रुवारी 2021 मध्ये मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी कणकवलीत आलेल्या गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपमध्ये नारायण राणेंचा सन्मानच होईल. या विधानाची द्विरुक्ती केली. आणि अवघ्या सहा महिन्यात (7 जुलै 2021 ला) नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्रीपदही देण्यात आले आहे.
मेक इन इंडिया पासून आत्मनिर्भर भारत या स्वयंरोजगार, रोजगार, वाढविणाऱ्या संकल्पना सत्यात उतरविण्यामध्ये सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोदी सरकारने केंद्रस्थानी आणले आहे. या मंत्रालयाचा कारभार वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्याची आणि पुन्हा एकदा आपल्या राजकीय कारकीर्दीवर साचलेली राजकीय जळमटे दूर करण्याची नवी संधी नारायण राणेंना मिळाली आहे. नारायण राणेंसारख्या आक्रमक नेत्याला सत्तेची जोड दिल्याने महाराष्ट्रातील भाजपला बळ मिळाले आहे. म्हणूनच नारायण राणेंच्या नव्या राजकीय कारकीर्दीचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटणार हे पहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
