मुंबई, ता. 03 : देशभरातील बळीराजासह संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे, तो मान्सून आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. Monsoon to hit Kerala
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. ४ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल, अशी चिन्हं सध्याच्या हवामान प्रणालीच्या हालचालींवरून दिसत आहेत. त्यानंतर पुढील ४ दिवसांत तळकोकणात मान्सून धडकेल. अन् कोकणातून मुंबई आणि महाराष्ट्रभर मान्सून प्रवास करेल, असा अंदाज आहे. १० तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. Monsoon to hit Kerala

मुख्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील हवामानात वेगाने बदल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांत सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. Monsoon to hit Kerala