• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा पोलीस अधीक्षकांची गोपाळगडावर स्वच्छता मोहीम

by Manoj Bavdhankar
June 3, 2026
in Old News
80 1
0
Cleanliness Drive at Gopalgad
157
SHARES
448
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील गोपाळगड या किल्ल्याला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अचानक मंगळवारी भेट दिली. पर्यटक व जागा मालक यांच्यामध्ये पडलेला आबा उचलण्यावरून किल्ल्याच्या मालकी हक्क बाबत विषय पुढे आल्याने यावर वाद निर्माण होण्याची शक्यता होती. गेले चार दिवस किल्ल्यावर दहा पोलीस कर्मचाऱ्यांची कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा ठेवण्यात आली होती. मंगळवारी स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी किल्ल्याला भेट दिली. या भेटीबाबत पत्रकारांजवळ बोलताना आपण किल्ल्याच्या आतील जागा मालकाची भेट घेतली. त्यांनाही या जागेच्या अधिग्रहणाबाबतचे प्रक्रिया सुरू असल्याचे माहित आहे. यामुळे कोणताही मोठा वाद त्या ठिकाणी नाही. Cleanliness Drive at Gopalgad

Cleanliness Drive at Gopalgad

गुहागर तालुक्यातील गोपाळगड हा पुरातत्व विभागाचा आहे. आतील जमिनीचे मालक खाजगी असली तरी सदर जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे सदर किल्ला पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असल्याची माहिती देत नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली यांनी गोपाळ गडाला भेट देताना आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गडावर स्वच्छता कार्यक्रम राबवून गडाच्या स्वच्छ व संवर्धनाचा संदेश दिला आहे. Cleanliness Drive at Gopalgad

त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे स्वच्छता मोहीम राबवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गड संवर्धनासाठी गडाचे जतन व संवर्धनासाठी स्वच्छता करणे गरजेचे आहे. असेही यावेळी त्यांनी संदेश दिला. तसेच गडावर आणखी काही दिवस दोन पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. Cleanliness Drive at Gopalgad

गडाच्या स्वच्छतेसाठी पोलीस अधीक्षक सरसावले

केवळ गोपाळगड किल्ल्याला भेट देऊन परत न फिरता आपल्याबरोबर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन स्वतः हातामध्ये झाडू घेऊन गडाच्या स्वच्छतेचा कार्यक्रम राबवला. गडातील धान्य गोदामातील भाग चकाचक केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे सर्व अधिकारी व कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले. यावेळी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत. रत्नागिरी पोलीस दलातील दहा पोलीस व गुहागर मधील सहा पोलीस या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. Cleanliness Drive at Gopalgad

Tags: Cleanliness Drive at Gopalgad
Share63SendTweet39
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.