सचिन बाईत : जिल्हा प्रशासनाची सापत्न वागणूक का
गुहागर, ता. 18 : अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे गुहागर तालुक्यातील लसीकरण कासवगतीने सुरु आहे. आजपर्यंत तालुक्यातील केवळ 4 हजार 672 इतक्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर 22 हजार 332 लोकांचा लसीचा पहिला डोस घेवून झाला आहे. तालुक्यात एकही सुसज्ज रुग्णालय नाही हे माहिती आहे. तरीही जिल्हा प्रशासन गुहागर तालुक्याला अन्य तालुक्यांपेक्षा कमी लस का देते. ही सापत्नपणाची वागणूक का असा रोखठोक सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी उपस्थित केला आहे.
Vaccination in Guhagar taluka has started at a snail’s pace due to insufficient vaccine supply. To date, only 4,672 people in the taluka have taken two doses of the vaccine. 22 thousand 332 people have been vaccinated with the first dose. Shiv Sena’s talukapramukha Sachin Bait has raised a serious question as : District Administration very welly knows there is no well equipped hospital in Guhagar taluka. Yet why does the district administration give less vaccines to Guhagar taluka than other talukas. why this is the behavior of partiality.
गुहागर तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 10 हजार 723 इतकी आहे. त्यामध्ये वय वर्ष 18 वरिल लोकसंख्या 98 हजारपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 4 हजार 672 व्यक्तींचे लसीकरण (दोन डोस) पूर्ण झाले आहे. आजपर्यंत फक्त 27 हजार 4 लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारतर्फे सातत्याने लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. आरोग्य विभागातर्फे गावागावात लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. तेथे लसीकरणाच्या दिवशी केंद्रावर लांबलचक रांगा दिसतात. मात्र आरोग्य विभागाकडे 50,100 जास्तीत जास्त 200 डोस उपलब्ध असतात. त्यामुळे रांगेमध्ये तिष्ठत राहून देखील अनेकांना लस न घेताच परतावे लागते. लस न घेता परतणारे लोक गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनिधींना दोष देतात. त्यांना अपुऱ्या लस पुरवठ्याबद्दल काहीच माहिती नसते. कधी ऑनलाइन नोंदणी झालेल्यांना तर कधी ऑफलाईन नोंदणीधारकांना लस असे बदल केले जातात. या सगळ्यामुळे लसीकरणाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
कोरोना आपत्तीमध्ये आरोग्य सुविधांचा तुडवडा असल्याने सामान्य तालुकावासीयांना 50 कि.मी. दूर चिपळूण, कामथे, डेरवण येथील रुग्णालयांचा आसरा शोधावा लागतो. त्यामुळे गुहागर तालुक्यामध्ये लसीकरणाचा वेग वाढण्याची आवश्यकता आहे.
याबाबत बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, गुहागर तालुक्यात व्हेंटिलेटर, आयसीयु सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय नाही. साधारण आरोग्य सुविधाही उपलब्ध नाहीत असा जिल्ह्यात फक्त गुहागर तालुका आहे. तरीही अन्य तालुक्यात लसीचे 450 डोस तर त्याचवेळी गुहागर तालुक्याला फक्त 150 डोस येतात. ही सापत्नपणाची वागणूक जिल्हा प्रशासनाकडून का दिली जाते. कोरोनाच्या महामारीत गुहागरमधील जनतेचे हाल होतात हे दिसत नाही का. प्राधान्याने गुहागर तालुक्याचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. अन्यथा आम्हाला वेगळे पाऊल उचलावे लागत आहे.
