दि. 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये परीक्षा होणार
रत्नागिरी, ता. 08 : इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 घेण्यात येणार आहे. ही परिक्षा दिनांक 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत होणार आहे. Navodaya Vidyalaya Entrance Exam 2026

तरी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 करिता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.बसवराज यांनी कळविले आहे. Navodaya Vidyalaya Entrance Exam 2026