• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन

by Mayuresh Patnakar
May 2, 2021
in Bharat
16 0
0
अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतातील शक्तिशाली व्यक्तींकडून टाकला जातोय दबाव

गुहागर, ता. 1 : सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याबाबत धमक्यांचे फोन येत आहेत. यामध्ये भारतातील मुख्यमंत्री, उद्योजक यांचाही सहभाग आहे. त्यांच्या अपेक्षा आणि त्यासाठीची आक्रमकता अनाकलनीय आहे. अशी प्रतिक्रिया अदर पुनावाला यांनी द टाईम्स या लंडनमधील वृत्तपत्राच्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. दरम्यान भारत सरकारने अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे.  Serum Institute CEO Adar Poonawalla Said for Demanding Vaccine, threatening Phone calls from Powerful like CM, Businessman. Their expectations and aggression for it are incomprehensible. The Times from London takes Interview of Adar Poonawalla. Earlier Indian government provided  ‘Y’ category security to  Adar Poonwalla

भारतात सध्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढु लागल्यानंतर केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र देशातील लोकसंख्या आणि उपलब्ध लस यांचे प्रमाण व्यस्त आहे. लस मिळण्यासाठी भारत सरकारच्या कोविन ॲपवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लस मिळावी म्हणून लसीकरण केंद्रासमोर नागरिक गर्दी करत आहेत. या पार्श्र्वभुमीवर अदर पुनावाला यांनी शक्तीशाली व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचे विधान केले. त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अदर पुनावाला

शनिवारी (ता. 1 मे) लंडनमधील वृत्तपत्र द टाईम्स द्वारे अदर पुनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना पुनावाला म्हणाले की, भारताला आवश्यक असणाऱ्या लशीपैकी 90 टक्के लस निर्माण करण्याचे काम सध्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. आज प्रत्येकाला असे वाटतयं की दुसऱ्या आधी आपल्याला लस मिळाली पाहिजे. या अपेक्षांपोटी भारतातील शक्तिमान लोकांकडून माझ्यावर दबाव टाकला जातोय. मला धमक्या दिल्या जात आहे. ही आक्रमकता माझ्यासाठी अनाकलनीय आहे. त्यांच्या मागण्या मी पूर्ण करु शकत नाही. कदाचित त्यांच्या अपेक्षा रास्त असतीलही, परंतू त्या पूर्ण करण्यासाठी अशापध्दतीने वागणे हे नक्कीच योग्य नाही. मला कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिली गेली तरी ते काय करतील याचा अंदाज येवू शकत नाही. त्यामुळेच मी, माझ्या पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये आलो आहे.

याच मुलाखतीदरम्यान यु.के.मध्ये व्यावसायिक कारणांसाठी आलो असल्याचेही पुनावाला यांनी सांगितले. अदर पुनावाला म्हणाले की, लंडनला येण्याचे आणखी एक कारण आहे. भारताबाहेर कोविशिल्ड बनु शकते का याबाबत आम्ही चाचपणी करत आहोत. लस निर्मितीसाठी ब्रिटनमधील एका संस्थेसोबत बोलणी सुरु आहेत. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.