• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कवाड्या पर्यटकांसाठी खुल्या झाल्या

by Mayuresh Patnakar
April 26, 2021
in Old News
54 1
0
Guhagar Beach
107
SHARES
305
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरचे पर्यटन विविध आयामांनी बहरले

(गुढीपाडव्याच्या दिवशी 13 एप्रिलला दै. सकाळच्या राज्य आवृत्तीत प्रसिध्द झालेला माझा हा लेख आपल्यासर्वांसाठी….)

80 च्या दशकापर्यंत गुहागरकरांची हेटाळणी  ‘पुढची कवाडी’  म्हणून केली जायची. (याचा अर्थ आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला पुढच्या घरी जा असे सांगितले जायचे.) त्याला तात्कालिक कारणे ही अनेक होती. मात्र आज तेच गुहागर पाहुण्यांसाठी पायघड्या पसरत आहे. 90 च्या दशकात गुहागरमध्ये दाभोळ वीज कंपनी आल्यानंतर हा बदल झपाट्याने झाला. आज गावात 36 आस्थापनांमधुन 1500 पर्यटकांची व्यवस्था केली जाते. याशिवाय 10 हॉटेल व 3 खानावळींमधुन पर्यटकांच्या नाश्ता व भोजनाची सोय होते.

पर्यटकांचे मनोरंजनासाठी समुद्रकिनाऱ्यावर साहसी खेळांची सुविधा निर्माण झाली

कोकणातील सर्वात विस्तीर्ण साडेसात किलोमिटरचा रुपेरी वाळु असलेला किनारा असलेलं, नारळी पोफळीच्या सदाहरित बागांनी नटलेलं गाव म्हणजे गुहागर. तरी देखील 1993 पर्यंत गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत नव्हते. व्याडेश्र्वर आणि दुर्गादेवी ही दोन देवस्थाने कुलदैवत असलेली अनेक मंडळी इथे यायची. पुजाऱ्यांकडे रहायची आणि धार्मिक विधी झाले की निघुन जायची.  1993 च्या दरम्यान दाभोळ बंदरालगत गुहागर तालुक्यातील अंजनवेल, रानवी व वेलदूर परिसरात दाभोळ वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला.  70 टक्के बहुराष्ट्रीय मालकीच्या कंपनीच्या बांधकामासाठी इथे देश विदेशातील सुमारे 2 ते 3 हजार मंडळी इथे काम करत होती. त्याच्या निवासासाठी अनेकांनी आपल्या घरात थोडे बदल करुन खोल्या भाड्याने दिल्या. काहींनी लॉज बांधुन कंपनीला भाड्याने दिले. हॉटेल व्यवसाय सुरु झाले.  या कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळ्याचे साधनही समुद्रकिनाराच होता. त्यामुळे रविवारी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी होत असे. ही गर्दी पाहून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाने भेळपुरीची गाडी लावण्यास सुरवात केली.  याच काळात प्रकल्पाला विरोध करणारी आंदोलने सुरु झाली.  प्रदिर्घ काळ चालेल्या या आंदोलनाने राज्याचे राजकारणही घुसळून निघाले. दाभोळ वीज प्रकल्पात परदेशी कंपन्यांचा सहभाग असल्याने विदेशी प्रसार माध्यमेही या आंदोलनांचे वृत्त प्रसिध्द करत होत्या. याच सुमारास भारतात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि इंटरनेटचा वापर सुरु झाला. त्यांनी दाभोळ वीज कंपनी आणि आंदोलनाच्या बातम्यांना प्रसिध्दी दिली. परिणामी गुहागरचे नाव एकदम जागतिक पटलावर चर्चेत आले. आंदोनलनांच्या वृत्तांकनांसाठी येणाऱ्या पत्रकारांनी गुहागरचा निसर्ग, स्वच्छ समुद्रकिनारा येथील मंदिरे यावर स्वतंत्र लेख लिहिले. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून पर्यटकांसाठी गुहागर हे नवे पर्यटनाचे स्थळ बनले. त्याकाळी येथील स्थानिकांचा दृष्टीकोन पर्यटन व्यवसायाचा नव्हता. अनेकवेळा फिरायला येणाऱ्या मंडळींनी त्याचा अनुभवही घेतला. 

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याला जीवरक्षकांच्या व्यवस्थेचे कोंदण

पुढे 1999 मध्ये दाभोळ वीज कंपनी बंद पडली. त्याचा मोठा आर्थिक फटका गुहागर, दापोली व चिपळूण तालुक्याला बसला. हातचा रोजगार केला. कंपनीमुळे सुरु झालेले धंदे बंद पडले. खऱ्या अर्थाने इथुन गुहागरच्या पर्यटन विकासाचा आरंभ झाला. कंपनी बंद झाल्याने रिकाम्या खोल्या पर्यटकांना रहाण्यासाठी मिळू लागल्या. दाभोळ वीज कंपनीतील नोकरीधंद्याच्या निमित्ताने  गुहागरमध्ये राहून गेलेली मंडळी मित्र परिसरावारासमवेत गुहागरमध्ये पर्यटनासाठी येवू लागली.  कंपनीच्या सोयीकरता उभ्या राहीलेल्या हॉटेलना पर्यटनाचा धंदा मिळाला. कंपनी बंद झाल्याने वाहन पुरवठा ठेकेदारांनी आपली वाहने पर्यटकांना भाड्याने देवू केली. या प्रक्रियेतून गुहागर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होवू लागले. बाजारपेठत कोकणी उत्पादने दिसु लागली. समुद्रकिनाऱ्यावर खाऊगल्ली उभी राहीली.  या बदलांची दखल घेत शासनानेही पर्यटनाभिमुख विकासाला इथे प्राधान्य दिले. गुहागरातील सांस्कृतीक व खाद्य संस्कृतीच्या दर्शनासाठी पर्यटन महोत्सव भरवले गेले. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेला महत्त्व देवून येथे जीवरक्षक व्यवस्था (Lifeguard) उभी केली गेली. कोकणच्या लोककला नमन खेळे, जाखडी नृत्य (Culure of Guhagar) पहाण्यासाठी पर्यटक येवू लागले. ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन उपक्रम, खाडी सफर, मगर दर्शन, चित्रीकरण, प्रिवीड शुट असे वेगवेगळे आयाम टप्प्याटप्यावर पर्यटनाला जोडले गेले. त्यातुन गुहागरचा पर्यटन व्यवसाय बहरु लागला आहे.

पर्यटनापाठोपाठ चित्रपट निर्मात्यांचे पाय देखील गुहागरकडे वळले

After 1993 Tourism started Guhagar. Due To Dabhol Power Project national, international media Came here for Reporting. The Reporters wrote Side Story, Articals, columns on Guhagar’s natural beauty, Tradition and Culture of Guhagar. Due to this, Guhagar flashed as New Tourism Point. In 1999 Power Project closed because of Enron. This was a turning point for Guhagarkars. In that situation Local public developed Tourism as Business. Now Film Making, Pri Weeding Shoot, Turtle Rehabilitation, Life Guard on Sea, Folk art of Guhagar like so many activites growing up the Tourism Business.

Share43SendTweet27
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.