• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीस भेट

by Guhagar News
February 17, 2024
in Guhagar
120 1
0
Visit to 'Ashida Electronics' Company

Visit to 'Ashida Electronics' Company

236
SHARES
673
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे तृतीय आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी वागळे इस्टेट ठाणे इथे असलेल्या ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स’ या एका नामवंत कंपनी मध्ये १५ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. आशिदा इलेक्ट्रॉनिक्स ही PLC, SCADA आणि ऑटोमेशन या बाबतीत मोठं नाव आणि कार्य असलेली एक नामवंत कंपनी आहे. १९७० साली स्थापन झालेल्या या कंपनीने आजवर ऑटोमेशन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे. मध्य रेल्वे मुंबई विभाग आणि कोकण रेल्वेच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे चलन करण्यातही या कंपनीचा मोलाचा वाटा आहे. Visit to ‘Ashida Electronics’ Company

Visit to 'Ashida Electronics' Company

ठाणे येथील ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स’ या नामवंत कंपनीत सकाळी १०:३० वाजता विद्यार्थी पोहोचल्यावर कंपनीच्या HR डिपार्टमेंट मधील प्रमुख सौ. मानसी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एका कॉन्फरन्स रूममध्ये एकत्र बसवून कंपनी बद्दल इत्यंभूत माहिती दिली. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना वागळे इस्टेट परिसरात असलेले कंपनीचे २ मुख्य प्लांट्स दाखवण्यात आले. या प्लांट व्हिजिट मध्ये सौ. अश्विनी पाटील आणि श्री. प्रथमेश केळस्कर हे आशिदा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे २ अभियंते विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करीत होते. दुपारी २ वाजता या शैक्षणिक भेटीची सांगता करण्यात आली. Visit to ‘Ashida Electronics’ Company

Visit to 'Ashida Electronics' Company

प्रस्तुत भेटीच्या यशस्वीततेकरिता कंपनीकडून सौ. मानसी कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून डॉ. श्री. विजय बेडेकर (कार्याध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ, ठाणे), डॉ. नरेंद्र सोनी (प्राचार्य), श्री. सतिश घोरपडे (विद्युत अभियांत्रिकी विभागपप्रमुख) यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी श्री. योगेश काटदरे (सहाय्यक प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी विभाग) यांनी विशेष मेहनत घेतली. Visit to ‘Ashida Electronics’ Company

Tags: Visit to 'Ashida Electronics' Company
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.