शिवजयंती व राम मंदिर सोहळ्यानिमित्त रेशनकार्ड धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
मुंबई, ता. 11 : अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू रामाच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व शिवजयंती या दोन उत्सवांच्या निमित्तानं राज्यातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. Ration card holders will get ‘Ananda Cha Shidha’
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत रेशनकार्ड धारकांना ही खूशखबर देण्यात आली. दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. Ration card holders will get ‘Ananda Cha Shidha’
त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार असं राज्य सरकारने जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधाचं वाटप केला जाणार आहे. याआधी आनंदाचा शिधा हा दिवाळी दसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जात होता. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत हा आनंदाचा शिध्याच वाटप केलं जाणार आहे. Ration card holders will get ‘Ananda Cha Shidha’