• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘ऑफ्रोह’चे रत्नागिरीत नारे निदर्शने आंदोलन!

by Manoj Bavdhankar
July 17, 2023
in Ratnagiri
215 2
0
Movement of 'Ofroh' in Ratnagiri
423
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणा-या अन्यायविरूद्ध

गुहागर, ता. 17 : संविधान कायदा 108 – 1976 क्षेत्रबंधन उठवल्याने  आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावे. व अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणारा अन्याय दूर करणेसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन व महिला आघाडीच्या वतीने  रत्नागिरीसह राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले. Movement of ‘Ofroh’ in Ratnagiri

ऑफ्रोह शाखा रत्नागिरीच्यावतीने प्रसिद्धीप्रमुख व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑफ्रोहच्या वतीने अन्यायग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन  जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह  यांना देण्यात आले. निवेदन देण्यासाठीच्या शिष्टमंडळात ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष  गजेंद्र पौनीकर, उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव बापुराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, हरीभाऊ ताडे यांचा समावेश होता. Movement of ‘Ofroh’ in Ratnagiri

अनुसूचित क्षेत्रातील (TSP) अनु. जमातीप्रमाणेच OTSP तील आदिवासींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावेत, TSP आदिवासींच्या सर्व योजना OTSP तील आदिवासींना लागू करा, जर न्याय मिळत नसेल तर विस्तारीत क्षेत्रातील ३३ अनु. जमातींच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या १४ बोगस आदीवासी आमदार व २ बोगस आदिवासी खासदार यांना हटवा, माजी न्यायमुर्ती गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात ६५०० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका, आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष मा. सुरेश धस यांचा आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा. अनु. जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीने “प्रधान” यांना ‘परधान’ जमातीचे, “आंध” यांना ‘अंध’ जमातीचे, “बुरुड” यांना ‘गोंड जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समितीची व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा, या मागण्यांचा समावेशही निवेदनात करण्यात आला आहे. Movement of ‘Ofroh’ in Ratnagiri

या नारे निदर्शने आंदोलनात ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, उपाध्यक्ष  नंदा राणे, सचिव बापूराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, माजी उपाध्यक्ष सिंधुताई राजेश सनगाळे व महिला आघाडीच्या सचिव  सुनंदा देशमुख, सहसचिव स्वाती रोडे, सदस्य प्रतिभा रोडे, सुरेखा घावट तसेच रत्नागिरी ऑफ्रॉहचे  पंडित सोनवणे,  विलास देशमुख, हरिभाऊ ताडे, सतिश घावट, विलास घावट, बंडू चेचरे, राजेश कुंभारे, श्रीकृष्ण भांडे, राजेश सनगाळे, अशोक दांडगे,  शुभम  घावट इत्यादी उपस्थित होते. Movement of ‘Ofroh’ in Ratnagiri

Tags: Movement of 'Ofroh' in Ratnagiri
Share169SendTweet106
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.