गुहागर, ता. 01 : प्रकृति फाऊंडेशन आणि गुहागर शहर महिला मंडळ यांच्यातर्फे दि. 30 मे रोजी ज्ञानरश्मी वाचनालयात परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांचे आरोग्य आणि सॅनेटरी पॅड चे व्यवस्थापन महिलांनी पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टिकोनातून घराच्या घरी कसे करावे. याबाबत प्रात्यक्षिकासह माहीती देण्यात आली. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

गुहागर शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा कार्यक्रम महिलांनी महिलांसाठी घडवून आणला होता. मासिक पाळी संदर्भात गैरसमजुती आणि मुली आणि स्त्रियांचे आरोग्य तसेच घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता याबाबतचे मार्गदर्शन चिपळूणच्या सुप्रसिध्द स्रिरोग तज्ञ डॉ. सुनेत्रा खातू यांनी केले. तसेच सॅनेटरी पॅड मुळे होणारे पर्यावरणीय धोके लक्षात घेता आपण घरच्या घरी याचे खत तयार करण्यासाठीच्या उपक्रमाची माहिती प्रकृति फाऊंडेशनच्या मिलन जंगम यांनी दिली. यासाठी मातीचे माठ व माती आणि शेणाच पाणी टाकून नैसर्गिक रित्या घरच्या घरी बागेत पॅड डिस्पोज कसे करावे व त्यापासून खत कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library
या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना तहसीलदार प्रतिभा वराळे मॅडम म्हणाल्या की, ‘हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून खरतर शाळा, कॉलेज मध्ये असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. प्रकृति फाऊंडेशनच्या माध्यमातून महीलांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम आयोजित करावेत.’ Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

या उपक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. पारिजात कांबळे आणि सौ. मिलन जंगम (प्रकृति फौंडेशन) यांनी केले होते. तर राजेंद्र आरेकर, शामल आरेकर, उमा बारटक्के, सोनाली घाडे, शामली घाडे यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी गुहागर शहरातील अनेक महिला मंडळातील महिलांनी सहभाग नोंदवला. यासाठी ज्ञानरश्मी वाचनालयाने विशेष सहकार्य केले. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library
