-
तळवळीत मुळे आणि काताळेत नाटेकर समर्थकांचा पराभव
-
10 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व
-
4 ग्रामपंचायती गावपॅनेलकडे
-
प्रत्येकी एक ग्रामपंचायत भाजप, राष्ट्रवादीची
गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांमधुन तालुक्यावर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आज मतदान झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे. तर चार ग्रामपंचायती गाव पॅनेलच्या आल्या आहेत.
गुहागर तालुक्यात 29 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 16 ग्रामपंचायतींपैकी कुडली, मुंढर, गिमवी, कोंडकारुळ, अडूर, पडवे, खामशेत, मळण, साखरी बुद्रुक, शिर या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर काजुर्ली, तळवली, काताळे, मासु, या ग्रामपंचायतींवर गावपॅनेलचे निर्विवाद विजय मिळवला आहे. निगुंडळ ग्रामपंचायत भाजपने ताब्यात ठेवली असून भातगावच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.
शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख यांनी 29 ग्रामपंचायतीपैकी 24 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात राहील्या असल्याचा दावा केला आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी सरपंच उपसरपंच निवडीनंतरच आम्ही आमच्या ग्रामपंचायती किती याचे उत्तर देवू. आज झालेल्या 68 जागांच्या मतमोजणीमध्ये भाजपचे 33 उमेदवार निवडून आले आहे. हे 33 ग्रामपंचायत सदस्य आमचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे 48.52 टक्के जागांवर आम्ही विजय मिळवला असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
तळवली ग्रामपंचायत : विनायक मुळेंच्या वर्चस्वाला धक्का
तळवली ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सध्याच्या पंचायत समिती गुहागरच्या सभापती सौ. विभावरी मुळे व भास्कर जाधव यांच्या सोबत 2009 पासून सावली सारखे असणारे विनायक मुळे व त्यांच्या समर्थकांचे राजकारण गावाने मोडित काढले आहे. गावपॅनेलच्या वादळासमोर विनायक मुळे यांच्यासह समर्थक उमेदवारांचा पराभव झाला.
प्रभाग १ –
सचिन गंगाराम कळंबटे (311) , अनंत गंगाराम डावल (309) , सविता सदानंद शिंदे (260)
प्रभाग २ –
संतोष पांडुरंग जोशी (252)
प्रभाग ३ –
सुनिल धोंडु मते (251), मयुरी महेश शिगवण (243), मानसी विलास पोफळे (238).
निगुंडळ ग्रामपंचायत : भागवत, गावडेंचा निसटता विजय
भाजपचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग १ मध्ये निवडणूक झाली. भाजपचे पदाधिकारी मयुरेश भागवत यांच्यासाठी ही निवडणूक अटीतटीची बनली होती. मतमोजणीमध्ये मयुरेश भागवत आणि सुभाष गावडे यांचा निसटता विजय झाला.
प्रभाग क्र. १ –
सुभाष गणपत गावडे (118 एक मताने विजयी) ,
मयुरेश अशोक भागवत (120, दोन मतांनी विजयी) ,
दिप्ती दिपक गिजे (107)
भातगाव ग्रामपंचायत :
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जाधव यांनी गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीच्या माजी पंचायत समिती सदस्या गायत्री जाधव यांच्या एकमात्र प्रभागात ही निवडणूक झाली. स्वाभाविकपणे तेथून गायत्री जाधव या निवडूनही आल्या. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीने ताब्यात ठेवण्यात दिपक जाधव यांनी यश मिळविले आहे.
प्रभाग क्र. ३ – गायत्री उदय जाधव (85)
कोंडकारुळ ग्रामपंचायत : रमेश अडूरकर पराभूत
ही ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली आहे. प्रत्येक निवडणुकीत येथून उभे रहाणारे रमेश अडुरकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते दादा अडूरकर यावर्षी निवडणुकीच्या राजकारणापासून थोडे दूरच होते. माजी उपसभापती पांडुरंग कापले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार भास्कर समर्थक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जिंकली.
प्रभाग २ – संदिप दगडू ढोर्लेकर, (141)
प्रभाग ३ – दत्ताराम विठोबा पालशेतकर (207),
प्रभाग क्र. ४ – रविंद्र येशा पावरी. (179)
अडूर ग्रामपंचायत : पांडुरंग कापले यांचे नेतृत्त्व यशस्वी
आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक, गुहागर पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग कापले यांच्या गावातील निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची असते. गेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने चुणूक दाखवली होती. यावेळी मात्र कापले यांच्या नेतृत्त्वाखाली नवे (आमदार भास्कर जाधव समर्थक) आणि जुने शिवसैनिक एकत्र आले. एकीच्या बळाने अडूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
प्रभाग १ –
सुरेश नारायण मांडवकर (191), वैभव काशिराम जाधव (210), अक्षता अनिल नितोरे, (190)
प्रभाग क्र. ३ –
उमेश मधुसुदन आरस (329), अशोक नाना देवळे (314), सुहासिनी सुधाकर देवळे (299),
प्रभाग क्र. ४ – प्रभाकर गोविंद कावणकर. (292)
काजुर्ली ग्रामपंचायत : शिवसेनेकडेच
गुहागर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष डॉ. आनंद जोशी यांच्या गावाने शिवसेना पुरस्कृत पॅनेलला निवडून आणले आहे.
प्रभाग क्र. १ – सुधाकर गुणाजी गोणबरे, (124)
प्रभाग क्र. २ – नंदकुमार बाळु धांगडे (232), अजित शांताराम मोहिते, (216)
प्रभाग क्र. ३ – स्नेहल संतोष गुरव, (119)
कुडली ग्रामपंचायत : वसंत किल्लेकरांना पराभवाचा धक्का
शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या कुडली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक वर्ष गावच्या राजकारणात सक्रीय असलेले आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक वसंत किल्लेकर यांना मात्र पराभव स्विकारावा लागला. संतोष पावरी यांनी वसंत किल्लेकरांचा 9 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्र. 1 – संतोष नारायण पावरी (229), प्रतिक्षा राजेंद्र किल्लेकर (298),
प्रभाग क्र. ३ – राकेश गणपत देसाई, (209)
पडवे ग्रामपंचायत : आमदार समर्थकांचा विजय
पडवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना आणि आमदार भास्कर जाधव समर्थक असा दोघांचा विजय झाला आहे. असं म्हणण्याचे कारण एवढेच की, येथील काही उमेदवार हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना यापैकी काहीजणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. विजयी झाल्यानंतरही त्यांनी आमदार भास्कर जाधव यांचा विजय असो अशा घोषणा ही दिल्या. मात्र ग्रामपंचायत शिवसेनेची म्हणण्यास नाकारले. पडवे ग्रामपंचायतीच्या प्रभाग चार मधुन निवडून आलेले राजेंद्र खातू आणि सौ. लिना गडदे हे शिवसैनिक आहेत.
प्रभाग क्र. 1 – शहनाज अली खले, (195)
प्रभाग २ –
मुजीब हुसेन जांभारकर (351), फारुक इक्बाल गुहागरकर (326), शमा जावेद माखजनकर (350),
प्रभाग क्र. ३ –
शौकत अल्लाउद्दीन जांभारकर (251), रफिक अ. लतिफ सारंग (235), नादिया इक्बाल इब्जी (258),
प्रभाग क्र. ४ –
लिना शरद गडदे (184), राजेंद्र शंकर खातू (174)
मासू ग्रामपंचायत : गावपॅनेलने दिला आनंद भोजनेंना धक्का
मासू ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांनी गाव पॅनेलला कौल दिला. भाजप कार्यकर्ते विजय मसुरकर आणि मासूतील माजी सरपंच विलास जाधव यांच्या पुढाकाराने हे गाव पॅनेल बनले होते. शिवसेनेने मासु गावातील निर्णय आनंद भोजने यांच्यावर सोडला होता. मात्र त्यांच्या पॅनेलचा पराभव करत ग्रामपंचायतीमध्ये गावपॅनेलला निर्विवाद बहुमत मिळाले आहे.
प्रभाग क्र. १ –
प्रकाश पांडुरंग भोजने (95), विलास देवराम जाधव (80), उज्ज्वला विजय भोजने (88),
प्रभाग क्र. २ – सिमरन संदिप नाचरे (94), शर्मिला सुरेश आलीम (112),
प्रभाग क्र. ३ – देवजी लक्ष्मण डिंगणकर (145), उज्ज्वला यशवंत नाचरे (150),
मुंढर ग्रामपंचायत : शिवसेनेचे निर्विवाद बहुमत
मुंढर ग्रामपंचायतीमध्ये सत्तेच्या वाटणीवरुन भाजप शिवसेनेत बिनसलं आणि बिनविरोधच्या मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांना चांगलाच फटका बसला. शिवसेनेने एकाही उमेदवाराला तीन आकडी मते मिळू दिली नाहीत. मुंढरमध्ये आजही शिवसेनाच आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले.
प्रभाग १ –
रविंद्र बाबु चिले (134), अमिषा अजिज गमरे (121),
प्रभाग २ –
सुशिल पांडुरंग आग्रे (230), प्रणिता नरेश रामाणे (237), दर्शना दयानंद बेलवलकर(198)
साखरी बुद्रुक ग्रामपंचायत :
प्रभाग क.२ –
संतोष काशिनाथ पवार (155), समिर प्रमोद पेडणेकर (132),
मळण ग्रामपंचायत :
प्रभाग क्र. ३ – विरेंद्र वसंत नाटुस्कर (290)
काताळे ग्रामपंचायत : नाटेकर समर्थकांचा पराभव
काताळे म्हणजे जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांचा गाव. प्रभाग ३ मधुन महेश नाटेकर समर्थक मुकेश असगोलकर आणि वृत्तिका कुळ्ये हे दोन उमेदवार उभे होते. त्यांच्या प्रचारासाठी दोन दिवस जि.प.उपाध्यक्ष गावात थांबले होते. मात्र मतदारांनी नाटेकर समर्थकांना नाकारले. येथून मधुकर असगोलकर आणि राजश्री कुळ्ये हे दोन उमेदवार निवडून आले. तर भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या पत्नी सौ. प्रियांका प्रभाग 1 मधुन उभ्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र तिरंगी लढतीत प्रियंका सुर्वे विजयी झाल्या.
प्रभाग क्र. १ –
प्रसाद शांताराम सुर्वे (154), प्रियांका निलेश सुर्वे (231), नम्रता वसंत निवाते (278),
प्रभाग क्र. २ – विनायक लक्ष्मण बारस्कर (179),
प्रभाग क्र. ३ – मधुकर कृष्णा असगोलकर (260) , राजेश्री राजेंद्र कुळ्ये (250),
खामशेत ग्रामपंचायत : राजकीय वैर संपून बंधु आले एकत्र
खामशेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने अशोक पारदळे आणि विष्णू पारदळे यांना एकत्र आणले. गेली सुमारे 20 वर्ष हे दोन सख्खे चुलत भाऊ राजकीय पटलावर एकमेकांचे शत्रु बनले होते. पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पारदळे यांनी भाजप सोडल्यावर विष्णू पारदळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. या निवडणुकीत गावामध्ये जागा वाटपावरुन तट पडले. अशोक पारदळे, विष्णू पारदळे यांनी पॅनेल उभे केले आणि निवडूनही आणले.
प्रभाग क्र. १ –
दिपाली दिनेश पालकर (251), मंगेश तानाजी सोलकर (249),
प्रभाग क्र. २ –
सिध्दी सुहास नरळकर (131), अस्मिता संजय कदम (131),
प्रभाग क्र. ३ –
रमेश विठ्ठल पारदळे (178), विष्णू लक्ष्मण पारदळे (171), वर्षा वसंत माचिवले (166),
गिमवी ग्रामपंचायत : भाजपने दिली चिवट झुंज
येथे भाजप पुरस्कृत गाव पॅनेल विरुध्द गिमवी पुरस्कृत गाव पॅनेल अशी निवडणूक होती. यापूर्वी राष्ट्रवादीत असलेले कार्यकर्ते आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत शिवसेनेत गेले. तरीदेखील येथे गिमवीत भाजपने झुंज दिली. येथील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे ५ आणि भाजपचे ४ उमेदवार निवडून आले. दोन जागांवर भाजप उमेदवारांना कमी फरकाने पराभव झाला.
प्रभाग क्र. १ –
महेंद्र दत्ताराम गावडे (200), प्रसाद सुभाष सोमण (196), नेत्रा संदिप कदम (206)
प्रभाग क्र. २ –
वैभवी विजय जाधव (141), निवेदिता देवजी सकपाळ (147), प्रतिभा अनंत महाडिक (126)
प्रभाग क्र. ३ –
सतिश अशोक इंदुलकर (159), सीमा दत्ताराम घाणेकर (156), दिपाली दिपक सकपाळ (178)
शिर ग्रामपंचायत : गावातील नेत्यांचा प्रभाव कायम
राजकीय चढाओढीचा समाजावर सातत्याने असलेला प्रभाव शिरमध्ये पहायला मिळतो. रिपब्लिकन नेते अनंत पवार, आमदार जाधव समर्थक सिताराम ठोंबरे, शिवराम आंबेकर असे नेते सांगतील तो शब्द पाळणारी ग्रामपंचायत असे चित्र कायमचं इथं असते. येथील ५ जागा बिनविरोध निवडून आल्या. तर ४ जागांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत गावातून गावावर आपला प्रभाव कायम असल्याचेच या नेत्यांनी दाखवून दिले आहे.
प्रभाग क्र. १ –
रामचंद्र पांडुरंग पवार (200), पूर्वजा विनायक गुरव (217), संजना समिर मोरे (280)
प्रभाग क्र. २ – अमित रघुनाथ साळवी (266),