चिपळूणमध्ये दि. १६ एप्रिल रोजी; तब्बल १५० स्पर्धकांनी नावनोंदणी
गुहागर, ता. 12 : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी “कुंभार्लीचा राजा” (King Of Kumbharli) ही भव्य सायकल स्पर्धा दि. १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. गतवर्षीच्या उत्कंठावर्धक स्पर्धेमुळे यावर्षी तब्बल १५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले खेळाडू आणि दोन परदेशी सायकलस्वार कुंभार्ली घाट सर करण्यासाठी चिपळूणमध्ये दाखल होणार आहेत. ‘Kumbharli’s King’ grand cycling competition
सन २०२० मध्ये स्थापन झालेल्या चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात. कुंभार्लीचा राजा स्पर्धेला मागच्या वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तेव्हा ८५ हून अधिक स्पर्धकांनी ही स्पर्धा गाजवली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडूंनी अक्षरशः सेकंदाच्या फरकाने पहिले पाच नंबर पटकावले होते. ‘Kumbharli’s King’ grand cycling competition
यावर्षी खुला गट, ४० वर्षांवरील स्पर्धक व महिला गट अशा एकूण तीन गटात स्पर्धा होणार असून स्पर्धा बक्षिसांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ही स्पर्धा सकाळी सहा वाजता बहादुरशेख नाका येथून सुरू होऊन कुंभार्ली घाटमाथ्यावर संपणार आहे. २९ किलोमीटर अंतरामध्ये सुमारे १२ किमीचा घाट असल्याने या स्पर्धेतील चुरस वाढली आहे. ‘Kumbharli’s King’ grand cycling competition खुल्या गटातील प्रथम येणाऱ्या पहिल्या खेळाडूला रुपये १०००० चे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सर्व गटांसाठी चषक, रोख बक्षिसे अशी एक लाख रुपयाहून अधिकची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. चिपळूणमधील अनेक दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी अर्थसहाय्य केले आहे. स्पर्धेचा शुभारंभ चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून केला जाणार आहे. ‘Kumbharli’s King’ grand cycling competition
देशभरातून येणाऱ्या स्पर्धकांमधील थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी १६ एप्रिलला वेळ सकाळी ठीक ५.४५ वाजता बहादूरशेख नाका येथे उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे करण्यात येत आहे. स्पर्धेनंतर माधव सभागृह, भोगाळे येथे विजेत्यांना चषक व बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी बहुसंख्येने दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन क्लबने केले आहे. ‘Kumbharli’s King’ grand cycling competition