तालुक्यातील 253 तर जिल्ह्यातील ४३२८ बजावणार मतदानाचा हक्क
गुहागर, ता. 30 : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक २०२३ करिता सोमवार दि. ३० जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी गुरुवार दि. ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार आहे. Teacher Constituency Election
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी आज ३० जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांचा समावेश आहे. कोकण शिक्षक मतदार संघात पालघर जिल्ह्यात ९०००, ठाणे १५,७३६, रायगड १००००, रत्नागिरी ४३२८, सिंधुदुर्ग जिल्हयात २४५६ मतदार नोंदणी झाली आहे. एकूण ४१ हजार ५२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Teacher Constituency Election

या निवडणूकीकरीता नव्याने तयार करणेत आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनाच केवळ मतदान करता येईल. मतमोजणी गुरुवार दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजलेपासून सुरु होईल. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा कोंकण विभागाचे उपआयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. Teacher Constituency Election