• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये दि. ४ व ५ फेब्रुवारीला किनारा युवा महोत्सव

by Ganesh Dhanawade
January 23, 2023
in Guhagar
120 1
0
Shore Youth Festival in Guhagar
236
SHARES
674
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 :  लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेने गुहागर च्या तरुण पिढीला सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने किनारा युवा महोत्सव सुरू केला आहे. दरवर्षी या महोत्सवाला गुहागर वासीयांनकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. यावर्षी दि. ४ व ५ फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर येथे किनारा युवा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी गुहागर वासीयांनी या महोत्सवाचा भरभरून आनंद घ्यावा, असे आव्हान लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Shore Youth Festival in Guhagar

मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे हा युवा महोत्सव झाला नव्हता. लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि उत्साहामुळे महोत्सव यावर्षी घेण्याचा निर्णय लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेने घेतला आहे. या युवा महोत्सवात तालुक्यातील विविध महाविद्यालयातील आणि अन्य युवा वर्ग सहभागी होतात. यामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा, संगीत मैफिल, रसिक प्रेक्षकांना लकी ड्रॉ, नृत्याविष्कार असे विविध उपक्रम सादर केले जातात. तसेच महिला भगिनींसाठी हळदीकुंकू, होमिनिस्टर कार्यक्रम, फनी गेम्स, आरोग्य तपासणी शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. Shore Youth Festival in Guhagar

गुहागरचे माजी सभापती स्व.सदानंद आरेकर साहेब यांच्या स्मरणार्थ गुहागर तालुक्यातील वर्षभरात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडू तसेच सामाजिक, शैक्षणिक, कला आरोग्य अश्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना स्व.स.गो. आरेकर युवा गुहागर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. Shore Youth Festival in Guhagar

शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०२३ आणि रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ असे दोन दिवस गुहागर वासीयांनी मोठ्या उत्साहात किनारा युवा महोत्सव साजरा करूयात, असे आव्हान लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Shore Youth Festival in Guhagar

Share94SendTweet59
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.