चतुरंग प्रतिष्ठान ; ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित
गुहागर, ता. 27 : श्री.देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर ची विद्यार्थी कनिष्का बावधनकर हिला चतुरंगचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चतुरंग प्रतिष्ठान कडून जिल्ह्यातील २९ शाळांमधील २९ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. Best Student Award to Kanishka
गुरूवर्य स्व. एस. वाय. गोडबोले गुरूजींच्या नावाने २१ वर्षांपासून चतुरंग प्रतिष्ठान सुरू आहे. या चतुरंगच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराच्या निवडीसंदर्भात दोन दिवसांपूर्वीच ग्रुप मुलाखती चतुरंगच्या कार्यालयात झाल्या. यावर्षी ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भगिरथ ग्रामविकास संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डेरवण एसव्हीजेसीटीच्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालिका शरयू यशवंतराव, सावर्डे येथील स्वर्गीय गोविंदराव निकम विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. अतिशय शिस्तबध्द अशा मुलाखती पार पडल्या. Best Student Award to Kanishka
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/12/add-4-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/12/add-4-1.jpg)
पुरस्कारासाठी निवड झालेले विद्यार्थी
अनुष्का अरूण सकपाळ (मोरेश्वर आगवेकर मा. विद्यालय, अलोरे), आकांशा अभय गरवारे (न्यू इंग्लिश स्कूल, पोफळी), समता सुनील जाधव (माखजन इंग्लिश स्कूल), श्रवण प्रसाद पावशे (पुज्य सानेगुरूजी विद्यामंदिर, पालगड), अमेय रामचंद्र घाणेकर (श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय, कोंडगांव), कुणाल संतोष मुंडेकर (चंद्रकांत बाईत मा. विद्यालय, आबलोली), आर्यन उमेश केसरकर (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा), वीरप्रतापसिंह सुनील पाटील (तात्यासाहेब मुळे मा. विद्यालय, जाकादेवी), प्रणव संदीप गायकवाड (गोविंदराव निकम विद्यालय, सावर्डे), सोहम नीलेश साने (ए. जी. हायस्कूल, दापोली), जिज्ञा जयप्रकाश बोरवणकर (रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी), कनिष्का समीर बावधनकर (श्रीदेव गोपाळकृष्ण विद्यामंदिर, गुहागर), सुयश चंद्रकांत अरमरे (डॉ. नातू स्मृति प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल मार्गताम्हाने), श्रावणी शिरीष भालेकर (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी-चिंचघरी), यश राजेश नेवरेकर (न्यू इंग्लिश स्कूल, पाग चिपळूण), आर्या कल्पेश जुवेकर (यु.इं. स्कूल, चिपळूण), सई अमोल भागवत (वसंतराव भागवत मा. विद्यालय, मार्गताम्हाने), आर्या अनिवृध्द भावे (श्रीमती रखुमाई पोडूरंग पालशेतकर मा. विद्यालय, पालशेत), संगम सुहास रांगले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड), वेदांत किरण शिवणकर (न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे), श्रीया माधव काजळे (राजापूर हायस्कूल), प्रांजल सुर्यकांत गोनबरे (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड), प्रियांका गंगाराम गवंडी ( कै. सौ, मीनाताई ठाकरे मा. विद्यालय, साडवली), गायत्री रोहीत बांडागळे (न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख), मधुरा दिगंबर करमरकर (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), समिक्षा प्रभाकर जाधव (वसंत जयराम भागवत विद्यामंदिर, बोरगांव), आदिनाथ संतोष वारे (शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी), तनिश शशिकांत मोदी (एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कूल, परशुराम), प्रांजल महेश चाचुर्डे (सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण). Best Student Award to Kanishka