• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमधील ७ बिनविरोध ग्रा. पं. शिवसेनेच्या

by Ganesh Dhanawade
December 15, 2022
in Guhagar
369 4
0
Shiv Sena's 7 gram panchayats unopposed
725
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मित्रपक्षांनी मदतीचे कोणतेही स्वारस्य दाखविले नाही – आ. भास्कर जाधव

गुहागर, ता.15 : तालुक्यातील निवडणुकांमध्ये एकूण २१ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रा. पं. बिनविरोध आल्या आहेत. यापैकी दोन गाव पँनेलच्या असून ७ ग्रा. पं. उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेकडे आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी मदतीचे कोणतेही स्वारस्य दाखविलेले नसल्याचे स्पष्टीकरण आमदार भास्कर जाधव यांनी दिले. Shiv Sena’s 7 gram panchayats unopposed

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गुहागर तालुक्यात ग्रा. पं. च्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आमदार जाधव गुहागर पंचायत समितीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. तालुक्यात महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. महाविकास आघाडीच्या प्रमुखांशी एकत्रित लढण्याबाबत मी चर्चाही केली होती. मात्र, त्यांनी कोणताही इंटरेस्ट वा स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे बिनविरोध आलेल्या ग्रा. पं. या उद्धव ठाकरे शिवसेना म्हणूनच त्या आमच्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गाव पँनेल म्हणून दोन आलेल्या ग्रा. पं. आमच्यापर्यंत चर्चेसाठी आजपर्यंत आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या आमच्या आहेत असे आम्ही म्हणणार नाही. तसेच उर्वरित १० ग्रा. पं. ही शिवसेनेकडे येतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. Shiv Sena’s 7 gram panchayats unopposed

पाटपन्हाळे ग्रा. पं. ही मोठी असल्याने ती सर्वांनी मिळून एकत्रित लढविणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील २१ ग्रा. पं. पैकी कोतळूक, खोडदे, मढाळ, जांभारी, वडद, आवरे-असोरे, पालकोट-त्रिशूळ, साखरीत्रिशूळ, पाली या ९ ग्रा. पं. बिनविरोध आल्या आहेत. Shiv Sena’s 7 gram panchayats unopposed

Share290SendTweet181
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.