• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य सांगावे

by Mayuresh Patnakar
October 29, 2022
in Politics
17 0
0
CM should tell the truth to the people
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खासदार सुप्रिया सुळे : महत्वाच्या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव 

गुहागर, 29 : टाटा एअरबस संदर्भात मा. उपमुख्यमंत्र्यांनी महिनाभरात दोन वेगवेगळी विधाने केली आहेत. उद्योगमंत्री हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात गुजरातला गेल्याचे सांगतात. यावरुन राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता मा. मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य काय आहे सांगावे. अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केली. CM should tell the truth to the people

गेल्या ३ महिन्यात महाराष्ट्रातून वेदांता- फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) गुंतवणूक 1.54 लाख कोटी आणि  रोजगार निर्मिती 1.5 लाख;  बल्क ड्रग्ज पार्क (Bulk Drug Park) गुंतवणूक 2750 कोटी आणि रोजगार निर्मिती 80 हजार;  मेडिसीन डिव्हाईस पार्क (Medical Device Park) पाठोपाठ आता नागपुरात होऊ घातलेला टाटा एअरबसचा (Tata Airbus Project) 21935 कोटी आणि रोजगार निर्मिती 6 हजार. हे सर्व प्रकल्प गुजरातला गेले. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाक्‌युद्ध सुरु झाले आहे. CM should tell the truth to the people

 यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही उडी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला (Gujarat) गेले आहेत. नागपूरला होऊ घातलेला टाटा एअर बसचा सुमारे 21 हजार 935 कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प वडोदरा येथे गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 6 हजार जणांना रोजगार मिळणार होते. काही दिवसांपुर्वीच वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प देखील गुजरातला गेला. हा अगोदर पुणे जिल्ह्यातील चाकण येथे होणार होता. सुमारे 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होती. राज्यातील सुमारे दीड लाख लोकांना यामुळे रोजगार (Employment) उपलब्ध होणार होता. याखेरीज रायगड जिल्ह्यात होऊ घातलेला बल्क ड्रग पार्क हा सुमारे पावणेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प देखील गुजरातला गेला. या प्रकल्पातून राज्यातील 80 हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. याशिवाय राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देखील मिळणार होता. हे असे एकामागून एक महत्वाचे प्रकल्प गुजरातला जात असताना याच सरकारमधले मंत्री महोदय सातत्याने परस्परविरोधी विधाने करीत आहेत. CM should tell the truth to the people

टाटा एअरबस प्रकल्पाबाबत काही दिवसांपुर्वी माननीय उपमुख्यमंत्री हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळे एक वर्ष आधीच हा राज्याबाहेर गेल्याचे सांगतात. एका वाहिनीवर महिनाभरापुर्वी हेच मंत्री हा प्रकल्प नागपुरात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगत होते. थोडक्यात अतिशय महत्वाच्या या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करणारा हा प्रकल्प गुजरातला कसा गेला. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी  (CM Eknath Shinde) सरकारची भूमिका ठामपणे स्पष्ट करण्याची गरज आहे. माझी त्यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण याबाबतीत जी काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत जनतेला सत्य काय ते सांगावे.  अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. नागपूरला होऊ घातलेला टाटा एअर बसचा सुमारे २१ हजार ९३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प वडोदरा येथे गेला. pic.twitter.com/U0er7RMctF

— Supriya Sule (@supriya_sule) October 28, 2022

Tags : वेदांता- फॉक्सकॉन, Vedanta-Foxconn, बल्क ड्रग्ज पार्क, Bulk Drug Park, मेडिसीन डिव्हाईस पार्क, Medical Device Park, राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार, सुप्रिया सुळे, NCP, MP, Supriya Sule, रोजगार, Employment, CM Eknath Shinde, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi,

Tags: CM should tell the truth to the people
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.