एमकेसीएलचा उपक्रम : विनामुल्य नोंदणी, अगणितवेळा सराव
गुहागर : कोरोनाच्या काळात शाळा अजुनही सुरु झालेल्या नसल्या तरी बहुतेक विद्यार्थी ऑनलाइन क्लास, व्हॉटसॲपवरुन पाठवलेले व्हिडिओ, सह्याद्री वाहिनिवरुन प्रसारित होणाऱ्या शैक्षणिक मालिकांद्वारे अभ्यास करत आहेत. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे दिवाळीपूर्वी शाळेची पहिली सहामाही होते. पण शाळाच सुरु नाहीत तर परिक्षा कशी देणार. असा प्रश्र्न विद्यार्थी, पालक, शिक्षकांना पडला असेल. पण चिंता करु नका. एमकेसीएल फाऊंडेशनने विनामुल्य सहामाही परिक्षा देण्याची सुविधा निर्माण केली आहे. तेव्हा ही बातमी वाचा, अधिक माहितीसाठी श्री कॉम्प्युटरसारख्या MSCIT शिकविणाऱ्या संस्थांना भेटा. परिक्षा देवून दिवाळीचा किल्ला करायला, फराळ खायला मोकळे व्हा.
विद्यार्थी मित्रांनो, शहरी भागातील शाळांनी सहामाही परिक्षेला पर्याय म्हणून तोंडी परीक्षा, बहुपर्यायी – वस्तुनिष्ठ प्रश्र्नमालिका अशा ऑनलाईन सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थांच्या परीक्षा घेण्यास सुरवात केली आहे. याच पध्दतीने इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची सुविधा टिलीमिली आणि एमकेसीएलने करुन दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण केलेल्या अभ्यासाचे मुल्यमापन व्हावे. आपण कुठे कमी पडतोय ते आपल्याला समजावे अशा विद्यार्थ्यांना ही सुविधा विनामुल्य उपलब्ध आहे. यासाठी फक्त सुरुवातीला एकदाच tilimili.mkclkf.org या संकते स्थळावरुन जावून विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. ही नोंदणी झाल्यावर विद्यार्थ्यांना लॉगीन व पासवर्ड मिळेल. हा लॉगीन आणि पासवर्ड वापरुन विद्यार्थी कितीही वेळा, विविध विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देवू शकतात. प्रत्येक विषयाच्या प्रश्र्नपत्रिकेत पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित 30 प्रश्र्न असतील. एका परीक्षेचा कालावधी 30 मिनिटे असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी प्रश्र्नपत्रिका प्रत्येकवेळी वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे जितक्या जास्त वेळा विद्यार्थी परिक्षा देतील तितक्या वेळा नवनविन प्रश्र्नपत्रिका सोडविण्याची संधी मिळेल. सहाजिकच विद्यार्थ्यांचा अभ्यासही पक्का होईल. शिवाय गुणांमध्येही सुधारणा होईल. गंमत म्हणजे या परिक्षेचे वेळापत्रक प्रत्येक विद्यार्थी स्वत:च बनवू शकतो. चला तर मग आपले मुल्यमापन आपणच करु या. शाळा नसली तरी काय झालं पहिल्या सहामाहीची परिक्षा आपण देवूया.
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या परिक्षेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर गुहागर शहरातील श्री कॉम्प्युटर, त्याचप्रमाणे तालुक्यात जीथे जीथे MSCIT, एमकेसीएलचे अधिकृत कार्यालय आहे तेथे जावून तुम्ही या परिक्षेची माहिती घेवू शकता.