पालकमंत्र्यांनी दिले झुकते माप; 20 गावातील 30 कामांचा समावेश
गुहागर, ता. 31 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीमधून जनसुविधा योजना (Jan Suvidha Yojana from District Planning Committee) सन २०२२-२३ अंतर्गत गुहागर तालुक्यातील 20 गावांमधील 30 कामांकरीता 2 कोटी 10 लाख 50 हजाराचा निधी दिला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर कामांची तांत्रीक मान्यता व प्रशासकीय अंदाजपत्रक सादर करण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांना दिले आहे. ही सर्व कामे संबंधित ग्रामपंचायतीद्वारे केली जाणार आहेत. 2 crore for Guhagar taluka
आर्थिक वर्षाच्या अखेरीस जिल्हा नियोजनमधून (District Planning Committee) जनसुविधा अंतर्गत गुहागर तालुक्याला पालकमंत्री उदय सामंत (Guardian Minister Uday Samant) यांनी झुकते माप 2 crore for Guhagar taluka दिल्याचे समोर येत आहे. गुहागर तालुक्यातील मुंढर गावातील ४ कामांसाठी 20 लाख 50 हजार, पालशेत गावातील 3 कामांसाठी, आरे गावातील 2 कामांसाठी, जामसुदमधील 3 कामांसाठी, कोळवलीतील 2 कामांसाठी, मळण गावातील 2 कामांसाठी आणि वरवेली, कोंडकारुळ, अंजनवेल, धोपावे, विसापूर, पांगारी, मळण या गावातील 1 कामासाठी निधी देण्यात आला आहे. यामध्ये रस्ते खडीकरण व डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्मशानशेड आदी कामांचा समावेश आहे.
2 crore for Guhagar Taluka
ग्रामपंचायत निहाय पुढील कामांसाठी हा निधी देण्यात आला आहे. मुंढर येथे मुंढर मेन रोड ते युवराज आगरे घरापर्यंत रस्ता खडीकरण, डांबरीकरणासाठी १० लाख, मुंढर आगरेवाडी लांजेकरवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, मुंढर शिरबाबाडी चाळकेवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, मुंढर बौद्धवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, पालशेत आगडीमंदिर रस्ता डांबरीकरणासाठी ८ लाख, पालशेत आगरेवाडी येथे स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, पालशेत अण्णा विलणकर मार्ग ते शिगवणवाडी रस्ता डांबरीकरणासाठी ७ लाख, वरवेली भुवडवाडी बौद्धवाडी रस्ता डांबरीकरणासाठी ८ लाख, कोंडकारूळ गंगामाता रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ८ लाख, अंजनवेल उमेश किल्लेकर घर ते भोईवाडा रस्ता करणे ५ लाख, धोपावे मुख्य रस्ता ते खारवीवाडी ब्रीज रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ७ लाख, आरे साईनाथ कळझुणकर घर ते रघुवीर घाडे घरापर्यंत रस्त्यासाठी ८ लाख, आरे लक्ष्मीनारायण मंदिर ते महेश भोसले घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ८ लाख, विसापूर कारूळ मुख्य रस्ता ते उंबरेवाडी सहाणेपर्यंत रस्त्यासाठी ८ लाख, पांगारी सडेवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, मळण गुरववाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, मळण पाखाडवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, जामसुद कुंभारवाडी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ८ लाख, जामसुद जांभुर्णवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार, जामसुद ग्रामपंचायत ते सहाणवाडी रस्ता डांबरीकरणासाठी ८ लाख, वेळणेश्वर स्मशानभुमी सुशोभिकरण व संरक्षण भींतीसाठी ५ लाख, काजुर्ली मेन रोड ते गोणबरेवाडी रस्ता खडीकरणासाठी ८ लाख, कुडली आंबेकर नगर ते ब्राह्मणवाडी रस्ता संरक्षक भींतीसह मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १२ लाख, कोळवली बौद्धवाडी ते नळीचीवाडी रस्ता तयार करणे ७ लाख, कोळवली ब्राह्मणवाडी ते गवाणवाडी ते पानबुडी ग्राम रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १५ लाख, मासू ग्रामपंचायत नवीन कार्यालयसाठी १५ लाख, पालपेणे मुख्य रस्ता ते तेलीवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ८ लाख, कोंडकारूळ कडा ते पन्याचा वड रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ८ लाख, आबलोली पांचाळवाडी स्मशानशेडसाठी ३ लाख ५० हजार तर निवोशी पोमेंडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ८ लाख रूपये. 2 crore for Guhagar taluka
Tags : Guhagar News, Marathi News, News in Guhagar, Guhagar, Top News, Local News, Latest News, Latest Marathi News, गुहागर न्यूज, मराठी बातम्या, स्थानिक बातम्या, ताज्या बातम्या, स्थानिक मराठी बातम्या, Jan Suvidha Yojana, District Planning Committee, 2 crore for Guhagar taluka, Guardian Minister, Uday Samant, पालकमंत्री, उदय सामंत, जनसुविधा योजना, जिल्हा नियोजन मंडळ, रत्नागिरी, Ratnagiri,